शाह-गडकरींचा मुंबई दौरा रद्द, फडणवीस दिल्लीला!

राज्याचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीसाठी रवाना झालेत. त्यांनी सकाळीच ओम माथूर यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीकडे निघाले. 

Updated: Oct 30, 2014, 10:31 AM IST
शाह-गडकरींचा मुंबई दौरा रद्द, फडणवीस दिल्लीला!  title=

मुंबई : राज्याचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीसाठी रवाना झालेत. त्यांनी सकाळीच ओम माथूर यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीकडे निघाले. 

मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं? कोणाकडे कोणतं खातं असणार? मित्रपक्षांना काय द्यायचं? शिवसेनेसोबत युतीचं काय होणार? याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी फडणवीस दिल्लीत गेलेत. 

यापूर्वी पक्षाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुंबईत येणार होते. मात्र, फडणवीसच दिल्लीत जात असल्यामुळे आता शाह-गडकरींचा दौरा रद्द झालाय. 

मंत्रीपदासाठी आणि महत्त्वाच्या खात्यांसाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू असलं, तरी आता त्याबाबतचा निर्णय दिल्लीतच होईल, हे यामुळे स्पष्ट झालंय. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.