chandrapur

ऑडिट विधानसभा मतदारसंघ - बल्लारपूर, चंद्रपूर

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ. मुनगंटीवार यांनी बल्लारपूरमधून चारवेळा आमदारकी भुषवली आहे. मुनगंटीवार यांचा विजयाचा हा महामेरू रोखण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

Oct 1, 2014, 07:24 PM IST

ऑडीट विधानसभा मतदारसंघ - वरोरा-भद्रावती, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक आमदाराला जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचे भाग्य साधारण १७ वर्षांनी लाभले. अर्थात जिल्ह्यातील आमदार आणि तोही २० वर्षे आमदारकी भोगलेला म्हटल्यावर मतदारांच्या अपेक्षाही वाढल्या. संजय देवतळे हे येथील आमदार. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ.

Oct 1, 2014, 07:05 PM IST

असाही नमुना... चार तासांत तीन राजकीय उड्या!

निवडणुका आल्या की बंडखोरी, बंडाळी, नाराजी, रूसवेफुगवे हे आलेच. तिकीट मिळत नाही असं दिसल्यावर तिकीटासाठी दुसऱ्या पक्षात जाणं हे तसं नवं नाही. पण तिकीटासाठी चंद्रपुरातल्या एका उमेदवारानं चक्क चार तासांत दोनदा पक्षांतर करण्याची चपळाई दाखवली. 

Sep 29, 2014, 07:54 PM IST

१६ वर्षीय विद्यार्थिनीला रस्त्यात विष पाजले

संगणक शिकवणी आटोपून घरी जाणा-या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीला एका माथेफिरू युवकाने भर रस्त्यात विष पाजल्याची घटना घडली. चंद्रपुरातील ही घटना आहे. या विद्यार्थिनीवर पाळत ठेऊन या युवकाने हे कृत्य केलंय.

Jun 1, 2014, 09:08 PM IST

‘महाऑनलाईन’ खातंय कष्टकऱ्यांची कमाई!

राज्यात अनेक घोटाळ्यांची मालिका उघड झाली. त्यात आता महाऑनलाईन घोटाळ्याची भर पडलीय. शेकडो बेरोजगार तरुणांची ‘महाऑनलाईन’ या शासकीय एजन्सीमार्फत नेमणूक करण्यात केली.

May 31, 2014, 07:10 PM IST

उष्माघातानं दीड वर्षांच्या ‘गणेशा’चा मृत्यू!

उष्माघातानं चंद्रपूरात पहिला बळी घेतलाय. चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गणेश या दीड वर्षाच्या हत्तीच्या पिल्लाचा उश्माघातानं मृत्यू झालाय.

May 3, 2014, 04:31 PM IST

अखेर त्या बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील आलेसुर गावात शेळ्यांवर ताव मारण्यासाठी आलेल्या एका पूर्ण वाढीच्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. वनविभागाच्या पथकाकडे बचाव कार्यासाठी अपुरी साधनं असल्यानं हा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलंय.

Apr 22, 2014, 08:57 AM IST