इंग्लंड दौऱ्यात 'हे' 5 खेळाडू होऊ शकतात टीम इंडियातून बाहेर, 3 दिग्गजांचा समावेश

Cricket News : जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाच खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. 

पुजा पवार | Updated: Jan 6, 2025, 12:59 PM IST
इंग्लंड दौऱ्यात 'हे' 5 खेळाडू होऊ शकतात टीम इंडियातून बाहेर, 3 दिग्गजांचा समावेश  title=
(Photo Credit : Social Media)

Cricket News : न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियाकडूनही टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा (Team India) दारुण पराभव झाला. तब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) गमावली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यातील पाच सामन्यांच्या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाने 3-1 ने आघाडी घेऊन सीरिज नावावर केली. आता टीम इंडिया थेट जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिज खेळणार आहे. टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला आता मोठा गॅप मिळाल्यामुळे भारतीय संघाला विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या खेळाडूंना पर्याय ठरू शकेल असा संघ तयार करायचा आहे. तेव्हा जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाच खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. 

बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024 -25 टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियात सलामी फलंदाज म्हणून अभिमन्यु ईश्वरन याचा समावेश करण्यात आला होता. परंतु अभिमन्युला बॉर्डर गावसकर सीरिजमधील एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच टीम इंडियाचा भविष्यातील प्लॅन पाहता टीम इंडियात सलामी फलंदाज म्हणून यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांची जोडी निश्चित झाली आहे. अशात अभिमन्यु ईश्वरन याला स्थान मिळणे अवघड आहे. 

विराटचा टेस्ट टीममधून पत्ता कट?

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा टेस्ट संघातून पत्ता कट होऊ शकतो. बॉर्डर गावसकर सीरिजमध्ये विराट कोहली 9 इनिंगमध्ये फक्त 190 धावा करू शकला. आता भारताचा पुढील टेस्ट सामना हा जुलै महिन्यात खेळवला जाणार असल्याने टीम मॅनेजमेंट चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरला विराट कोहलीचा पर्याय म्हणून पाहू शकतात. श्रेयस अय्यर देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे इंग्लंड टेस्ट सीरिजसाठी विराट कोहलीला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.  

हेही वाचा : 'माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला!

रोहित शर्मालाही दाखवला जाऊ शकतो बाहेरचा रास्ता : 

नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कर्णधार रोहित शर्मा संघासाठी मोठ्या धावा करण्यात फ्लॉप ठरला. याच कारणाने त्याला सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियातून ड्रॉप करण्यात आले. सिडनी टेस्टनंतर रोहित टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होईल अशी देखील खूप चर्चा झाली. तेव्हा जुलै महिन्यात होणाऱ्या इंग्लंड टेस्ट सीरिजपूर्वी टीम इंडिया रोहित शर्माला पर्याय असणाऱ्या खेळाडूचा शोध घेईल. 

रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा : 

भारताचा स्टार ऑलराऊंडर रविंद्र जडेजा सुद्धा सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. भारताबाहेरील खेळपट्ट्यांवर जडेजाचा गोलंदाजी आणि फलंदाजीतील रेकॉर्ड खराब आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये देखील जडेजाची कामगिरी खास ठरली नाही. अशावेळी इंग्लंड दौऱ्यात जडेजाला टीम इंडियात स्थान मिळणं अवघड आहे. तर हर्षित राणा याला देखील इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिजमधून बाहेर काढलं जाऊ शकतं. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यामुळे हर्षित राणा याला बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडियात संधी मिळाली होती मात्र शमी फिट झाल्यास हर्षित राणा याला इंग्लंड दौऱ्यात संधी मिळणं अवघड आहे.