आदिवासी गावात ज्ञानगंगा...
चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा तालुक्यातलं आदिवासीचं एक दुर्लक्षित गाव म्हणजे कोलामगुडा... या गावातील रस्ते, वीज, पाणी आणि शिक्षण या मूलभूत समस्यांबाबत 'झी २४ तास'नं वारंवार आवाज उठवला. आता पुन्हा एकदा 'झी २४ तास'च्या पाठपुराव्याला यश मिळाल्यामुळं गावात ज्ञानगंगा वाहणार आहे.
Jun 29, 2012, 10:14 AM ISTचितळेही शिकाऱ्यांच्या रडारवर
चंद्रपूरच्या जंगलात वाघांपाठोपाठ आता चितळेही शिकाऱ्यांच्या रडारवर आहेत. चंद्रपूर शहराच्या सीमेवरील जुनोना भागातून पोलिसांनी चितळ्यांची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून चितळ्याचे ताजे कातडेही जप्त केले आहे.
Jun 19, 2012, 05:27 PM ISTकोळसा खाणीत कामगाराचा करुण अंत
चंद्रपूर शहरालगतच्या पद्मापूर खुल्या कोळसा खाणीत झालेल्या एका भीषण अपघातात एका कोळसा कामगाराचा करुण अंत झाला. अशोक कांबळे असं या कामगाराचं नाव असून तो कोळसा उत्खनन करणा-या पोकलेन या अवाढव्य मशीनवर ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.
Jun 2, 2012, 08:16 AM ISTराज ठाकरेंच्या स्वागताला भाजप पदाधिकारी
चंद्रपुरातील ताडोबा दौ-यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी चक्क चंद्रपूरचे भाजप पदाधिकारी पोचले. आपल्या चंद्रपूर दौ-यात राज नागपूरहून थेट दाखल झाले ते ताडोबा जंगलात.
May 31, 2012, 01:00 PM ISTदागिन्यांचा हव्यास, गुन्ह्याकडे प्रवास
दागिन्यांच्या हव्यासापोटी एका सुशिक्षित घरातील तरुणीनं चोरी केल्याची घटना चंद्रपुरात घडली. पोलिसांनी या तरुणीला अटक केली आहे. तिच्याकडून चोरी केलेले दागिनेही हस्तगत करण्यात आलेत.
May 25, 2012, 08:29 AM ISTमनसेला साथ, भाजपला पडली महागात.....
भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात चंद्रपुरात शिवसेनेनं भाजपलाच धक्का दिला आहे. चंद्रपूर महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.
Apr 29, 2012, 07:27 PM ISTचंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांना काँग्रेसचा दे धक्का!!
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकित काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना मात्र चांगलाच धक्का बसणार असे दिसते आहे. मुनगंटीवार यांच्या चंद्रपूरमध्ये भाजपला अपेक्षित असं यश मिळत नाहीये.
Apr 16, 2012, 02:11 PM ISTमनसेचे मालेगावनंतर चंद्रपुरात खाते
मालेगाव पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन जागा मिळवित पालिकेत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आता चंद्रपूरमध्येही पालिकेत प्रवेश केल्याने महाराष्ट्रात मनसेची घोडदौड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
Apr 16, 2012, 12:20 PM ISTपाच महापालिकांच्या रणसंग्रामाचा आज निकाल
राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. लातूर महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून मालेगाव, परभणी आणि भिवंडी यांची मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तर चंद्रपुरात मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरूवात होईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Apr 16, 2012, 10:51 AM ISTचंद्रपूरचा उड्डाणपूल प्रश्न अजून अनुत्तरितच
चंद्रपूर महापालिका गठीत होऊनही शहरातील ५० हजार लोकवस्तीला भेडसावणाऱ्या बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचा प्रश्न लोंबकळतोच आहे. आता महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नानं पुन्हा डोकं वर काढलंय.
Apr 6, 2012, 08:18 AM ISTशिवसेना-भाजपची आता वेगळी चूल
भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याच चंद्रपूर शहरात महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांनी वेगळी चूल मांडली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात विदर्भासाठी मोठी तरतूद करण्याची मागणी करण्यात येते आहे.
Mar 24, 2012, 03:39 PM ISTकरा मटण पार्टी, जिंका निवडणूक
निवडणुका आणि ओल्या पार्ट्या हे समीकरण काही आता नवं राहिलेलं नाही. मात्र मटणाची पार्टी एका ठराविक विक्रेत्याकडील बकरे खरेदी करुन केल्यास निवडणुका जिंकता येतात असं तुम्ही कधी ऐकलंय का, मात्र असं घडलं आहे.
Mar 19, 2012, 12:56 PM ISTकिटाळी गावात वाघाचा मृत्यू
चंद्रपूरजवळच्या किटाळी गावात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. पूर्ण वाढीच्या एका वाघाचा मृत्यू झाल्याची बाब गस्तीवर असणा-या कनिष्ठ वन कर्मचा-यांच्या लक्षात आली.
Mar 2, 2012, 09:11 AM ISTताडोबा जंगलच जाळून टाकलं...
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात रिसॉर्ट बांधण्यासाठी १८ एकर जंगल जाळण्यात आलं आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातल्या मोहर्ली गावाच्या हद्दीतलं जंगल जाळून नष्ट करण्यात आलं आहे.
Feb 22, 2012, 03:18 PM ISTचंद्रपूर साहित्यनगरीत 'माय मराठी'चा जयघोष
डोईवर ग्रंथ घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील तरुणी, शिस्तबद्ध लेझीमपथक, मोरपंखांची टोपी घातलेला वासुदेव, अंगावर फटके मारणारा मरीआईचा भोप्या, अश्वारूढ मावळे, सजावट केलेले उंट, वाद्यवृंद पथकासह राष्ट्रसंतांच्या भजनांच्या सुरांनी नटलेल्या ग्रंथदिंडीने केलेल्या ‘माय मराठी'च्या जयघोषात अवघी चंद्रपूरनगरी दुमदुमून गेली. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभामंडपात न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले.
Feb 4, 2012, 09:04 AM IST