मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रात्री उशीरा पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीकडे असलेल्या ११४ जागांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. तसंच आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत राष्ट्रावादी काँग्रेस सोबत बैठक घेऊन आघाडीबाबत महत्त्वाची भूमिका घेणार असल्याचंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस 144 चा आग्रह सोडण्यास तयार असेल तर काँग्रेसही 130 पर्यंत जागा सोडण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जागावाटपावरून महायुतीतील तणाव इतका वाढला की महायुती आता तुटल्याच जमा आहे. तर दुसरीकडे आघाडीतही आनंदी आनंद नाही.
काँग्रेसचा 124 जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादीनं फेटाळला असून राष्ट्रवादीकडील 114 जागांबात काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. दरम्यान आज सकाळी काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेस यांच्यात महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत आघाडीबाबत अंतीम निर्णय घेतला जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.