अण्णांच्या दौऱ्याचा शिर्डीपासून प्रारंभ

जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनानंतर सक्षम लोकायुक्ताच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज शिर्डीपासुन आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात करत आहेत. अलीकडे मुंबईत झालेल्या अण्णांच्या आंदोलनाकडे जनतेने पाठ फिरवल्यामुळे हा दौरा अधिक प्रभावी करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे

Updated: May 1, 2012, 08:14 AM IST

www.24taas.com, शिर्डी

 

जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनानंतर सक्षम लोकायुक्ताच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज शिर्डीपासून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात करत आहेत. अलीकडे मुंबईत झालेल्या अण्णांच्या आंदोलनाकडे जनतेने पाठ फिरवल्यामुळे हा दौरा अधिक प्रभावी करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे.

 

शिर्डीतील सभेची तयारी आता अंतीम टप्यात आली आहे. साई संस्थानच्या प्रसादालया समोरील गोंदकर मैदानावर ३० बाय ६० अकाराचा मंच उभारण्यात येतोय. अन्नांचं भाषण सर्वांना व्यवस्थित ऐकता यावा यासाठी मैदानावर ४५ लाऊडस्पीकरची व्यवस्थाही करण्यात आलीये. अन्ना मंगळवारी दुपारी ३ वाजता शिर्डीत येतील.

 

चार वाजता साईमंदीरात येऊन साईंच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. त्याच ठिकाणी पत्रकार परीषदही घेणार आहेत. त्या नंतर उघड्या जीपमधुन अन्नांची मिरवणुक काढण्यात येणार आहे. संध्याकाळी सहा वाजता अन्ना शिर्डीतील गोंदकर मैदानात जाहीर सभाही घेणार आहेत. अण्णा ३६ दिवसांच्या दौ-यात राज्यात ६० सभा घेणार आहेत.  लोकायुक्तासाठी अण्णांच्या आंदोलनाला कितपत यश मिळेल, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

 अण्णांचा महाराष्ट्रव्यापी दौरा- कधी आणि कुठे?

१ मे- शिर्डी

२ मे- औरंगाबाद

३ मे- जालना

४ मे- उस्मानाबाद

६ मे- लातूर

७ मे- परभणी

८ मे- नांदेड

९ मे- हिंगोली

१० मे- वाशिम

११ मे- यवतमाळ

१२ मे- चंद्रपूर

१३ मे- गडचिरोली

१४ मे- गोंदिया

१५ मे- भंडारा

१६ मे- नागपूर

१७ मे- वर्धा

१८ मे- अमरावती

१९ मे- अकोला

२० मे- बुलढाणा

२१ मे- जळगाव

२२ मे- धुळे

२३ मे- नंदुरबार

२४ मे- नाशिक

२५ मे- पुणे

२६ मे-  सोलापूर

२७ मे- सातारा

२8 मे- सांगली

२९ मे- कोल्हापूर

३० मे- कणकवली, सिंधुदुर्ग

३१ मे- रत्नागिरी

१ जून -रायगड

२ जून - मुंबई

४ जून - ठाणे

५ जून - नवी मुंबई