काळापैसा जनतेचा, अण्णांचे ऑगस्टला आंदोलन

महागाईला काळापैसा जबाबदार आहे. परदेशातील काळापैसा हा जनतेचा आहे. काळ्यापैशाबाबत आणि जनलोकपालला सरकार घाबरत आहे. मात्र, भ्रष्टाचारविरोधात ऑगस्टमध्ये आरपारची लढाई लढणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. अण्णा हजारे आणि रामदेवबाबा यांचा भ्रष्टाचाराविरोधात लढा संयुक्त लढा असणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Updated: Apr 20, 2012, 04:31 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

महागाईला काळापैसा जबाबदार आहे. परदेशातील काळापैसा हा जनतेचा आहे. काळ्यापैशाबाबत आणि जनलोकपालला सरकार घाबरत आहे. मात्र, भ्रष्टाचारविरोधात ऑगस्टमध्ये आरपारची लढाई लढणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक  अण्णा हजारे यांनी सांगितले. अण्णा हजारे आणि रामदेवबाबा यांचा भ्रष्टाचाराविरोधात लढा संयुक्त लढा असणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

देशातील प्रत्येक क्षेत्रात होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे जनता त्रस्त झाली आहे.  जे सरकार जनतेचे ऐकत नाही, असे सरकार पडले तरी हरकत नाही, असे अण्णा हजारे आणि रामदेव बाबांनी राजधानीत पत्रकार परिषदेत सांगितले. लोकपाल विधेयक सामान्य जनतेच्या फायद्याचे नाही. तसेच देशाच्याही फायद्याचे नाही. अशा भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी आणि परदेशातील काळा पैसा भारतात यावा, यासाठी ऑगस्टमध्ये लढा देण्याचा निर्धार अण्णा आणि रामदेवबाबा यांनी केला आहे.

येत्या तीन जून रोजी रामदेव बाबा दि‍ल्लीत आंदोलन करणार असल्याचे रामदेव बाबांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी अण्णा हजारेंच्या महाराष्‍ट्र दौर्‍यालाही पाठिंबा दर्शविला आहे. अण्णा हजारे येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून लोकायुक्तासाठी महाराष्‍ट्र दौरा करणार आहे. या दौर्‍याला प्रारंभ  साई बाबांच्या शिर्डी येथून होणार असल्याचे अण्णांनी सांगितले.