राज ठाकरे म्हणतात, अण्णा लक्ष द्या

अण्णा हजारे यांचे आंदोलन भ्रष्ट्राचारा विरोधात आहे, याला आमचा पाठिंबा आहे. मात्र, अण्णांनी प्रथम महाराष्ट्रात लक्ष देण्याची गजर आहे. अण्णा हे चांगले व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणाचे दुमत असण्याची गजर नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.

Updated: Apr 26, 2012, 03:25 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

 

अण्णा हजारे यांचे आंदोलन भ्रष्ट्राचारा विरोधात आहे, याला आमचा पाठिंबा आहे. मात्र, अण्णांनी प्रथम महाराष्ट्रात लक्ष देण्याची गजर आहे. अण्णा हे चांगले व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कोणाचे दुमत असण्याची गजर नाही, असे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले.

 

 

राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा येण्यासाठी राज ठाकरे यांची अण्णांनी भेट घेतली. अण्णा हजारे आज मुंबईत असून, त्यांनी सुरुवातीला लोकायुक्त कायद्याविषयी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला जाणार होते. मात्र, बाळासाहेबांनी भेट घेण्यास नकार दिल्यानंतर अण्णांनी कृष्णकंज या  राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. याठिकाणी या दोघांमध्ये लोकायुक्त कायद्यावर चर्चा झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

 

अण्णांनी आपल्या सहकाऱ्यांबाबत विचार केला पाहिजे. त्यांच्यामुळे अण्णांच्या आंदोलनावर टीका होत  आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार आहे. त्यामुळे आधी महाराष्ट्रात अण्णांनी लक्ष दिले पाहिजे. सक्षम लोकपाल येण्याची गरज आहे. त्यासाठी आमचा अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. राज्याचा मुख्यमंत्रीही लोकपालच्या कक्षेत असायला हवा, ही आमची भूमिका आहे, असे राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

आम्हाला राजचा पाठिंबा - अण्णा  

 

राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांवेळी उमेदवारांची घेतलेली परीक्षा हे उत्तम होते. त्यामुळे गुंड, चारित्र्यहिन उमेदवार राजकारणात येणार नाही. राज ठाकरे यांनी पक्षाचा आम्हाला लोकायुक्त कायद्यासाठी पाठिंबा असल्याचे आश्वासन दिले आहे.

 

बाळासाहेबांनी भेट घेतली किंवा नाही घेतली, यामध्ये माझा काही स्वार्थ नाही. हा प्रश्न राज्याचा आहे. राज्यात लोकायुक्त कायदा गरजेचे आहे. त्यासाठी मी एक मे पासून सहा जूनपर्यंत ३५ जिल्ह्यांमध्ये सभा घेणार आहे. यामध्ये माझी काही वैयक्तीक फायदा नाही, मी फक्त राज्यासाठी करत आहे, असे अण्णा यांनी पत्रकारांशा बोलताना सांगितले.