केजरीवाल यांच्याविरोधात नाही - किरण बेदी

टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात किरण बेदींनी अण्णांना लिहलेल्या पत्राबाबत किरण बेदींनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आपण असं कोणतही पत्र अण्णांना लिहलं नसल्याचं बेदींनी म्हंटलं आहे.

Updated: May 26, 2012, 05:45 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात किरण बेदींनी अण्णांना लिहलेल्या पत्राबाबत किरण बेदींनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आपण असं कोणतही पत्र अण्णांना लिहलं नसल्याचं बेदींनी म्हंटलं आहे. तर आपल्याला या पत्राबाबत काहीही माहित नसल्याचं सांगून अण्णांनी यापूर्वीच याबाबत इन्कार केला होता. त्यामुळे नव्या वादाला आता तोंड फुलटले आहे.

 

टीम अण्णांमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याचा आरोप किरण बेदी यांनी मीडियाशी बोलताना केला आहे. आमची टीम चांगली आहे. या टीममध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता किरण बेदी यांनी फेटाळून लावली आहे. आपण कोणाबाबत पत्र लिहिलेले नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात  पत्र असल्याची अफवाच असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

 

दरम्यान, टीम अण्णानी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह १५ केंद्रीय मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. प्रशांत भूषण यांनी पत्रकार परीषदेत मंत्र्यांची नावे जाहीर केली. कोण-कोण मंत्री टीम अण्णाच्या निषाणावर आहेत.

 

टीम अण्णांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत युपीए सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. केंद्रातले १५ मंत्री भ्रष्टाचारी असून त्यांची त्वरित चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी एका पत्राद्वारे पंतप्रधानांकडे केलीय. विशेष म्हणजे टीम अण्णांनी पंतप्रधानांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. याशिवाय केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम, प्रणव मुखर्जी, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, कमलनाथ, सलमान खुर्शीद यांची नावं १५ जणांच्या यादीत आहेत.

 

या सर्वांची ३  न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी टीम अण्णांनी केलीय. त्याकरता टीम अण्णांनी सरकारला २४  जुलैपर्यंत अल्टिमेटम दिलाय आपली मागणी मान्य न झाल्यास 25 जुलैपासून आंदोलन करण्याचा इशारा टीम अण्णांनी दिला आहे.