ajit pawar

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप

Ajit Pawar on corruption :  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.

Mar 10, 2023, 08:19 AM IST

Maharashtra Budget 2023: उद्धव ठाकरे बजेटवर बोलताना अजित पवारांनी कुणाला मारला डोळा.. Video चर्चेत

Maharashtra Budget 2023: अजित पवार इकडे तिकडे पाहतात त्यांच्या बाजूला उभे असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर ते हात ठेवतात आणि डावीकडे पाहत हळूच कुणाला तरी डोळा मारतात असे व्हिडिओत दिसत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) प्रसारमाध्यमांना बजेटवर प्रतिक्रिया देत असताना अजित पवार यांची वेगळीच बॉडी लँग्वेज पहायला मिळाली.

 

 

Mar 9, 2023, 05:40 PM IST

Maharashtra Budget : सरकारने पंचामृत मांडले, पण अमृत कोणी पाहिलेले नाही - अजित पवार

Maharashtra Budget  : राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा चुनावी जुमला आहे. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करण्यात आले आहे. सरकारने पंचामृत मांडले, पण अमृत कोणी पाहिलेले नाही. उद्योगधंदेवाढीसाठी काहीही नाही, असा दूरदृष्टीहीन अर्थसंकल्प राज्य सरकारने सादर केला आहे, अशी टीका अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. 

Mar 9, 2023, 03:45 PM IST

Maharashtra Budget : 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून', मुख्यमंत्री शिंदे यांचा राष्ट्रवादीला जोरदार टोला

 Maharashtra Budget : नागालॅंड राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रिओ पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला जोरदार चिमटा काढला. नागालॅंड येथे ही  50 खोके एकदम ओके झाले का? बदलाचे वारे एकदम कसे वाहत आहेत ते बघा. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेला जोरदार टोला लगावला. (Maharashtra Political News in Marathi)

Mar 9, 2023, 12:55 PM IST

Maharashtra Budget 2023: शेतकरी प्रश्नावर सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार जुंपली; Eknath Shinde आक्रमक, अजितदादा संतापलेत

Maharashtra Budget 2023 : शेतकरी प्रश्नावरवरुन विरोधकांनी शिंदे - फडणवीस सरकारला जोरदार घेरले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार आहात की नाही, केवळ आश्वासन नको. ठोस निर्णय घ्या. याबाबत विरोधकांनी सूचना केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष यांनी चर्चा करण्यास नकार देत विरोधकांची सूचना फेटाळून लावली. त्यानंतर सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झालेत.  

Mar 9, 2023, 11:46 AM IST

Ajit Pawar : 'आज एका गोष्टीची खंत वाटतेय...' अजित पवार असं काय म्हणाले?

Ajit Pawar on Women's Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही. महिला दिन साजरा होत असताना महाराष्ट्र सरकारला हे शोभत नाही, असे ते म्हणाले.

Mar 8, 2023, 10:38 AM IST