ahmed patel

गुजरात निवडणूक | पोस्टरवरुन काँग्रेस-भाजपमध्ये नवा वाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 7, 2017, 04:05 PM IST

विजयानंतर अहमद पटेल यांचे, 'सत्यमेव जयते' ट्विट

 गुजरात राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली.  काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला आणि आपली जागा कायम राखली. आपल्या विजयानंतर अहमद पटेल यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले.

Aug 9, 2017, 08:06 AM IST

राज्यसभा निवडणूक, मध्य रात्रीचे राजकीय नाट्य आणि भाजप आमदाराची बंडखोरी

गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल मतदान झाले. भाजपकडून अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार होते. तर काँग्रेस नेते अहमद पटेल हे निवडणूक रिंगणात होते. पटेल यांना पाडण्यासाठी अमित शाह यांनी फिल्डींग लावली होती. मात्र, त्यात ते अपयश ठरले. दरम्यान, क्रॉस मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य पाहायला मिळाला. त्यामुळे मध्यरात्री निकाल जाहीर करावा लागला.

Aug 9, 2017, 07:58 AM IST

गुजरातमध्ये अहमद पटेल, अमित शाह, स्मृती इराणी विजयी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.

Aug 9, 2017, 06:29 AM IST

गुजरात: प्रतिष्ठेच्या राज्यसभा निवडणुकीत पटेलांचा विजय ? शहांना धक्का?

कॉंग्रेसच्या अहमद पटेल यांना 45 मतांची गरज आहे. त्यातच कॉंग्रेसच्या 6 आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे ही गरज आणखी वढली असून, कॉंग्रेस आमदारांचे संख्याबळ 57 वरून 51 वर आले आहे

Aug 8, 2017, 03:02 PM IST

अहमद पटेल यांना मतदान केलेले नाही, याचे दु:ख नाही : वाघेला

 काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना मी काँग्रेसला मतदान केलेले नाही. कारण त्यांना ४० मतेही मिळणार नाही, पटेल यांचा पराभव अटळ आहे, असा गौप्यस्फोट शंकरसिंग वाघेला यांनी केलाय.

Aug 8, 2017, 12:32 PM IST

राज्यसभा निवडणूक : भाजपचे अमित शाह, स्मृती इराणी तर काँग्रेसचे अहमद पटेल रिंगणात

गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.  

Aug 8, 2017, 08:55 AM IST

काँग्रेस आमदार फोडण्यासाठी भाजपकडून अपहरण - आझाद

गुजरात काँग्रेसचे आमदार वास्तव्यास असलेल्या कर्नाटकातील इगलटोन रिसॉर्टवर आयकर विभागानं छापेमारी केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केलेय. राज्यसभेत गुलामनवी आझाद यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. भाजपकडून अपहरणाचा प्रयत्न झालाय. तसेच आमदारांना फोडण्यासाठी १५ कोटी रूपयांची ऑफर करण्यात येत आहे. सूडबुद्धीने छापेमारी सुरु आहे, असे ते म्हणालेत.

Aug 2, 2017, 02:04 PM IST