Success Story Of Christopher Gardner : जीवनातील अडथळे हे आपल्या यशाच्या पायर्या आहेत;
प्रत्येक अडथळ्यावर मात करून आपण पुढे जातो.
यश मिळवणे इतकं सोपं नाही, मात्र एकदा तुम्ही दृढनिश्चय केला की ते इतकं अवघड नाही. आज आपण अशाच एका धाडसी आणि यशस्वी उद्योगपतीची कहाणी जाणून घेणार आहोत. हे यश त्याला अनेक संकटानंतर मिळालं. द्रारिद्य इतकं की, बायको त्याला सोडून गेली. त्यानंतर जवळ 4-5 वर्षांच्या लहान मुलगा...संकट डोळ्यासमोर, जिवंत कसे राहायच असा प्रश्न असताना त्याने श्रीमंत होण्याच ठरवलं. यशस्वी होण्याच भूत त्याला पछाडले आणि आज तो 600 कोटी रुपयांचे मालक आहे. हे यश त्यांनी कसं गाठलं त्याबद्दल जाणून घेऊयात.
आम्ही बोलत आहोत ख्रिस्तोफर गार्डनर यांच्याबद्दल. फेब्रुवारी 1954 मध्ये अमेरिकेत जन्म झाल्यानंतर बालपण फारसं काही चांगलं नव्हतं. फसवणुकीच्या गुन्ह्यात आई तुरुंगात तर बहीण पालनपोषणगृहात होती. मग जगण्यासाठी त्यांना भांडी धुण्याची वेळ आली होती. एका नर्सिंग होममध्ये पैशांसाठी ते रुग्णांची काळजी घ्यायचे.
वयाच्या 18 व्या वर्षी कसंबसं हायस्कूल पूर्ण केल्यानंतर ते यूएस नेव्हीमध्ये दाखल झाले. पण तिथेही नशिबाने साथ दिली नाही. त्यानंतर 1977 मध्ये त्यांचं शेरी डायसनशी लग्न झालं. लग्नाच्या तीन वर्षानंतर पत्नीला सोडून ते गर्भवती गर्लफ्रेंडसोबत राहायला लागले. जानेवारी 1981 गर्लफ्रेंडला मुलगा झाला. ख्रिस्तोफरला मूलबाळ नसल्यामुळे गर्लफ्रेंडच्या जॅकीचा मुलगा म्हणून स्विकार आणि त्याच नाव ख्रिस्तोफर ज्युनियर ठेवलं.
आता मुलासाठी ख्रिस्तोफरने एका संशोधन प्रयोगशाळेत सहाय्यक म्हणून काम करत होते. या कामासाठी त्यांना वर्षाला 8000 डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 6.68 लाख रुपये मिळायचे. पण या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता. तब्बल 4 वर्षांनी त्यांनी नोकरी सोडली आणि उत्पन्न वाढवण्यासाठी सेल्समन म्हणून वैद्यकीय उपकरणे विकण्यास सुरुवात केली.
Hamare Sath Shri Raghunath × The Pursuit of Happyness. pic.twitter.com/3oRQDdXJeT
— Cine Vichaar (@Cine_vichaar) February 15, 2022
ख्रिस्तोफरला सुरुवातीपासूनच मोठी व्यक्ती बनण्याची इच्छा होती. पण त्यांना कोणताही मार्ग दिसत नव्हता. एके दिवशी त्याला एक फोन आला ज्यामध्ये त्याला त्याची वैद्यकीय उपकरणे एका क्लायंटला दाखवायचे होते. या फोननंतर ते तिथे पोहोचल्यावर त्यांना त्या इमारतीबाहेर उभ्या असलेल्या लाल फेरारीचा मालक भेटला. त्याचं नाव होतं बॉब ब्रिजेस. ख्रिस्तोफरने बॉबला दोन प्रश्न विचारले, पहिला – तू काय करतोस? आणि तुम्हाला ही गाडी कशी मिळाली? बॉबने उत्तर दिलं की तो स्टॉक ब्रोकर आहे आणि महिन्याला 66.80 लाख रुपये कमावतो. बस हाच तो क्षण होता ख्रिस्तोफरने ठरवलं की तोही स्टॉक ब्रोकर होणार.
ख्रिस्तोफर पुन्हा बॉबला भेटला आणि त्यांनी स्टॉक ब्रोकर होण्यासाठी मदतीसाठी विचारलं. बॉबने त्याला वित्त जगताबद्दल सांगितलं आणि स्टॉक ब्रोकरेज फर्मच्या व्यवस्थापकाशी त्याची ओळख करून दिली. त्याने ख्रिस्तोफरला प्रशिक्षण कार्यक्रमाची ऑफर दिली. पुढील दोन महिन्यांसाठी, ख्रिस्तोफरने त्याच्या सर्व विक्री बैठका रद्द केल्या आणि प्रशिक्षण अगदी मनापासून घेतलं.
these two movies really sum up the struggles and unconditional love men have for their children.
1. the pursuit of happyness 2006
2. miracle in cell no. 7 2013 pic.twitter.com/LqJC2DdnfN— _Success (@_SuccessPOTUS) June 16, 2024
पण दुसरीकेड ख्रिस्तोफरची आर्थिक स्थिती सतत खालावत होती. प्रेयसीसोबतचे संबंधही बिघड होते आणि एके दिवशी पत्नी जॅकी मुलासोबत निघून गेली. त्यानंतर क्रिस्टोफरला 10 दिवस तुरुंगात राहावं लागलं कारण तो पार्किंगचा दंड भरू शकला नव्हता. प्रशिक्षणानंतर जेव्हा तो नोकरीसाठी कार्यालयात पोहोचला तेव्हा त्याला कळालं की, ज्या व्यक्तीने त्याला नोकरी दिली होती त्याला कंपनीने आठवड्याभरापूर्वीच काढून होतं. अशा स्थितीत अनुभवाचा अभाव, शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांना फुकट काम करण्याची वेळ आली. या काळात त्यांनी वैद्यकीय उपकरणांची विक्री सुरू ठेवली. कसा तरी तो महिन्याला 33 हजार रुपये मिळवत होते. मात्र यातून त्यांच्या घराचा खर्च भागू शकला नाही.
पुढे चार महिन्यांनंतर, गर्लफ्रेंड जॅकी परतली आणि आपल्या मुलाला ख्रिस्तोफरकडे सोडून गेली. त्या आर्थिक संकटात मुलाला सोबत ठेवणे ख्रिस्तोफरसाठी खूप आव्हानात्मक होतं. मुलाला तो जिथे राहत होता तिथे राहण्याची परवानगी नव्हती. तो कधी अनाथाश्रमात तर कधी स्टेशनवर आपल्या मुलासोबत राहवं लागलं. कधी उद्यानात तर कधी सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी झोपण्याची वेळ आली. हे जवळपास वर्षभर चाललं. एकदा तर त्यांना रेल्वे स्टेशनच्या बाथरूममध्ये झोपावं लागलं होतं. तर बराच वेळ त्यांना सूप पिऊन पोट भराव लागत होतं. त्यांनी जे काही कमावलं ते त्यांच्या मुलाच्या शिक्षणावर आणि दैनंदिन देखभालीसाठी खर्च करायचे.
ख्रिस्तोफरने खूप मेहनत घेतली आणि आज ते अमेरिकन स्टॉक ब्रोकरेज फर्म डीन विटर रेनॉल्ड्सचे उच्च कर्मचारी झाले आहेत. दररोज 200 ग्राहकांशी बोलण्याचे त्यांचे ध्येय असायचे. 1982 मध्ये, जेव्हा ख्रिस्तोफरने त्याच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या, तेव्हा ते बेअर स्टर्न्स अँड कंपनीमध्ये फूट टाइम कर्मचारी बनले. यानंतर त्याचं नशीब पालटलं.
1987 मध्ये त्यांनी गार्डनर रिच अँड कंपनी नावाची फर्म स्थापन केली. 2006 मध्ये, त्यांनी या कंपनीतील एक छोटासा हिस्सा विकला आणि ती एक कोटी डॉलरची कंपनी बनली. आज ख्रिस्तोफर हे जवळपास 600 कोटी रुपयांचा मालक आहे. 2006 मध्ये ख्रिस्तोफर या संघर्षावर एक हॉलिवूड चित्रपट आला आहे. 'द पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस' या चित्रपटात विल स्मिथने ख्रिस्तोफर गार्डनरची भूमिका साकारलीय. हा चित्रपट तुम्ही अनेक OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.