Anant-Radhika Wedding : महत्त्वाची बातमी! अनंत- राधिकाच्या विवाहसोहळ्यामुळे मुंबईतील 'हे' रस्ते 4 दिवस सर्वसामान्यांसाठी बंद

Anant-Radhika Wedding :  मुंबईतील हाय प्रोफाइल सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. पुढील 4 दिवस सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जाणून घ्या कोणत्या रस्त्याची वाहतूक बंद आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 6, 2024, 11:33 AM IST
Anant-Radhika Wedding : महत्त्वाची बातमी! अनंत- राधिकाच्या विवाहसोहळ्यामुळे मुंबईतील 'हे' रस्ते 4 दिवस सर्वसामान्यांसाठी बंद  title=
big news These roads in Mumbai are closed for 4 days due to Anant Radhikas wedding Mumbai Traffic update

Anant Radhikas wedding Mumbai Traffic update : आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या अनंत अंबानीचा विवाह सोहळा मोठ्या थाट्यामाट्यात आणि गॅण्ड करण्यात येतोय. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील हे शेवटचं लग्न असणार आहे. त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या घरात श्लोक आणि आकाश यांच्या मुलाचे लग्न असेल आणि त्यासाठी बरेच वर्ष असणार आहे. त्यामुळे अनंत अंबानी आणि श्लोका मेहताचं लग्न भव्य स्वरुपात करण्यात येतं आहे. शुक्रवारी 5 जुलैला अनंत आणि श्लोका यांचा संगीत समारंभ पार पडला. तर 12 जुलैला त्यांचा विवाहसोहळा होणार आहे. मुंबईतील हाय प्रोफाइल सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.

12 ते 15 जुलै रोजी दुपारी 1:00 ते मध्यरात्रीपर्यंत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरकडे जाणाऱ्या अनेक रस्त्यांवर प्रवेश प्रतिबंधित असणार आहे असं मुंबई वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

'या' मार्गांवर जाणे टाळा!

हा रस्ता बंद - या तारखांना कुर्ला एमटीएनएल रोडवर लक्ष्मी टॉवर जंक्शन ते धीरुबाई अंबानी स्क्वेअर एव्हेन्यू लेन-3, इंडियन ऑईल पेट्रोल पंप आणि डायमंड जंक्शन ते हॉटेल ट्रायडंट या मार्गावर वाहनांच्या वाहतुकीसाठी बंदी असणार आहे. 

पर्यायी मार्ग - बीकेसीकडून वाहनांनी लक्ष्मी टॉवर जंक्शनकडे डावीकडे वळावं, डायमंड गेट क्रमांक 8 कडे जावं, नंतर नाबार्ड जंक्शनकडे उजवीकडे वळून डायमंड जंक्शनकडे जावं आणि धीरूभाई अंबानी स्क्वेअर आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपकडे जावं. हाच मार्ग परतीसाठी वापरावा. 

हा रस्ता बंद -  कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन आणि डायमंड जंक्शनहून बीकेसी कनेक्टर ब्रिजकडे जाणाऱ्या वाहनांसाठी धीरूभाई अंबानी स्क्वेअर अव्हेन्यू/इंडियन ऑइल पेट्रोल पंप इथे प्रवेश बंदी असणार आहे. 

पर्यायी मार्ग - या वाहनांनी नाबार्ड जंक्शन इथून डावीकडे वळून डायमंड गेट क्रमांक 8 मधून पुढे जावं, लक्ष्मी टॉवर जंक्शनहून उजवीकडे वळून बीकेसीकडे जावं.

हा रस्ता बंद - भारत नगर, वन बीकेसी आणि गोदरेज बीकेसी रोडवरून यूएस कॉन्सुलेट आणि एमटीएनएल जंक्शनकडे जाणारी वाहतूक जिओ कन्व्हेन्शन सेंटर गेट नंबर 23 वर बंदी असणार आहे.

पर्यायी मार्ग - वाहनांनी कौटिल्य भवन इथून उजवीकडे वळावं, विमा संस्था कार्यालयाच्या मागे, अव्हेन्यू 1 रोडने पुढे जावं आणि धीरूभाई अंबानी शाळेमार्गे यूएस वाणिज्य दूतावासाच्या पुढे जावं.

हा रस्ता बंद - सिग्नेचर/रोड सन टेक बिल्डिंगवरील एमटीएनएल जंक्शनपासून यूएस कॉन्सुलेट, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि बीकेसी कनेक्टरकडे वाहनांना बंदी असणार आहे. 

पर्यायी मार्ग -  धीरूभाई अंबानी शाळेजवळ डावीकडे वळूण अव्हेन्यू 1 रोडने यूएस कौन्सुलेटच्या मागे जावं, नंतर आम्ही वर्क इथे उजवीकडे वळावे, गोदरेज बीकेसीहून डावीकडे वळूण पुढे जावं. 

 वन-वे -  लतिका रोड अंबानी स्क्वेअर ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंत आणि  एव्हेन्यू 3 रोड कौटिल्य भवन ते यूएस कॉन्सुलेट पर्यंत वन-वे असणार आहे. 

अनंत राधिका यांचं लग्न 12 जुलैला, 13 जुलैला आशीर्वाद समारंभ आणि 14 जुलैला रविवारी रिसेप्शन असणार आहे.