तलावात कोसळली कार, लेकीसाठी बापानेही घेतली उडी; थरारक व्हिडीओ समोर
Indore Car Falls Into Pond: बिजलपूर येथे राहणारा टूल्स व्यापारी तैयब अली पत्नी झेहरा आणि 12 वर्षांची मुलगी जौनकसोबत फिरायला आला होता. त्यांच्यासोबत दुसऱ्या गाडीत बिजलपूरचे आणखी चार ओळखीचे मित्र परिवार होते. तायब यांनी तलावाच्या काठावर कार उभी केली आणि हँड ब्रेक लावून पत्नी आणि मुलीसह खाली उतरले.
Aug 7, 2023, 05:30 PM ISTभात लावणीचे काम सुरु असताना मधमाशांचा हल्ला; शेतमालकासह महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Gondia News : गोंदियात शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.
Aug 5, 2023, 09:49 AM ISTडिश अँटेना सरळ करताना तोल गेला अन् गच्चीवरून पडून 14 वर्षीय मुलगा जीवाला मुकला
Nalasopara News : नालासोपारा येथे इमारतीच्या गच्चीवरुन पडल्याने 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इमारतीच्या गच्चीवर अल्पवयीन मुलगा टीव्हीचा डिश अँटेना सरळ करण्यासाठी गेला होता. मात्र तोल गेल्याने तो थेट खाली कोसळला.
Aug 4, 2023, 01:46 PM ISTमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काचांच्या ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
Mumbai Pune Expressway Accident : सध्या पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक उर्से टोल नाका आणि खंडाळा घाटात थांबवण्यात आली आहे. तर काही वाहतूक ही लोणावळ्यातुन जुन्या पुणे मुंबई महामार्गाने वळविण्यात आली आहे.
Aug 3, 2023, 08:44 AM ISTसमृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्पात भीषण अपघात; क्रेन कोसळून 17 मजुरांचा मृत्यू
Samruddhi Expressway Accident Thane: महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरु असतेवेळी गर्डरसह क्रेन कोसळली आणि काळानं 14 मजुरांवर घाला घातला...
Aug 1, 2023, 06:33 AM ISTकुलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; झोपेतच झटका बसल्याने घरातच गेला जीव
Akola Accident : अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील महान येथे कुलरचा शॉक लागल्याने पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे.
Jul 31, 2023, 11:14 AM ISTयवतमाळमध्ये पोलिसालाच चिरडलं; भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Yavatmal Accident : यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने चिरडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
Jul 30, 2023, 10:03 AM ISTमोहरमच्या मिरवणुकीदरम्यान मोठा अपघात; विजेच्या झटक्यामुळे चौघांचा मृत्यू
Muharram Procession Accident : झारखंडमधील बोकारो येथे मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. शनिवारी सकाळी मिरवणूक काढली जात असताना एक ताजिया एका हाय टेंशनच्या विद्युत ताराच्या संपर्कात आल्याने मोठा अपघात घडला. आतापर्यंत या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
Jul 29, 2023, 02:11 PM ISTपुण्यात विचित्र अपघात, धरणात कार कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू
Varandha Ghat : दरड कोसळत असल्याने पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही नियमा झुगारून नागरिक वरंधा घाटातून धोकादायक पद्धतीने प्रवास करताना पहायला मिळत आहे. अशातच एका अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Jul 29, 2023, 01:01 PM IST
पतीचा मृतदेह घरी नेताना अॅम्ब्युलन्सला जोरदार धडक; आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू
Ambulance Accident : उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्ते अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त करत जखमींना तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहेत.
Jul 29, 2023, 10:21 AM ISTबुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी महिलांनी अंगावरच्या साडीचा केला दोर; एक वाचला, पण...
Bhandara News : भंडाऱ्यात कासव पकडण्याच्या नादात दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. कासव पकडण्यासाठी तिघेजण विहीरात उतरले होते. मात्र गुदमरल्याने दोघांचा मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात यश आले आहे.
Jul 26, 2023, 01:22 PM ISTVIDEO : सेल्फी काढायला गेला अन्... दोन हजार फूट खोल कुंडात कोसळला तरुण
Ajanta Caves : छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी पाहायला आलेला तरुण सेल्फी काढताना थेट कुंडात कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने तरुणाला बाहेर काढलं आहे.
Jul 24, 2023, 10:27 AM ISTभयंकर! बाईकवरील स्टंटबाजीनं घेतला तरुणीचा जीव; क्षणात शीर धडावेगळे
Punjab News : भरधाव दुचाकीवर स्ंटट करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. स्टंट करताना तरुणीचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबमध्ये घडला आहे. तर मागे बसलेल्या तरुणाला त्याचा पाय गमवावा लागला आहे.
Jul 24, 2023, 09:13 AM ISTसरकारी रुग्णालयात गुदमरुन आठ रुग्णांचा मृत्यू; ऑक्सिजनअभावी जीव गेल्याचा कुटुंबियांचा आरोप
Andhra Government Hospital : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यात सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
Jul 23, 2023, 09:17 AM ISTघराबाहेर बिस्किट आणायला गेला अन् परतलाच नाही; वसईत नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू
Vasai Accident News : वसई-विरारसह नालासोपारा शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच वसईत नाल्यात वाहून गेल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Jul 22, 2023, 10:30 AM IST