accident news

घरातल्या पिठाच्या गिरणीने घेतला चौघांचा बळी; नातवांना पाहायला आलेल्या आजोबांचाही मृत्यू

Rajasthan News : राजस्थानमध्ये पीठ गिरणीमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेमुळं परिसरात शोककळा पसरली आहे.

Sep 2, 2023, 01:23 PM IST

बाळाला कुशीत घेऊन आईने घेतली इमारतीवरुन उडी; ठाण्यातील खळबळजनक प्रकार

Thane Crime : ठाण्यात क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून एका महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. एका वर्षाच्या मुलासह महिलेने पतीसोबत झालेल्या वादानंतर इमारतीवरुन उडी घेतली आहे. या घटनेनंतर इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Sep 1, 2023, 01:36 PM IST

रक्षाबंधनासाठी जात असताना पुण्यात मोठा अपघात; खडकवासला धरणात कारसह बुडून मुलीचा मृत्यू

Pune News : पुण्यात रक्षबंधनाच्या दिवशीच मोठा अपघात झालाय. रक्षाबंधनासाठी जात असताना पुण्यातील एका कुटुंबाची कार टायर फुटल्यामुळे थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली होती. या अपघातातून इतर चौघांना वाचवण्यात यश आलं मात्र एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झालाय.

Aug 31, 2023, 10:05 AM IST

तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावताना विजेचा धक्का लागून तिघांचा मृत्यू; वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

Wardha News : वर्ध्यात विजेचा धक्का लागल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. मंदिरावर झेंडा लावत असताना विजेच्या तारांना स्पर्श झेंड्याच्या खांबाचा स्पर्श झाल्याने तिघांना जोरदार विजेचा धक्का बसला. यामुळे तिघांचाही मृत्यू झाला आहे.

Aug 30, 2023, 12:51 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये दुकानाला भीषण आग; झोपेतच एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये पहाटेच्या सुमारास एका इलेक्ट्रिकच्या दुकानात भीषण आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

Aug 30, 2023, 09:28 AM IST

वडिलांना मदत करायला गेली अन्...; नळाचे पाणी भरताना शॉक लागून विद्यार्थिनीचा मृत्यू

Jalna News : जालन्यात विजेचा धक्का लागल्याने एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला आहे. भोकरदन तालुक्यात हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. दरम्यान, मुलीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Aug 28, 2023, 02:59 PM IST

Video : नातेवाईकांसह बोलण्यासाठी गाडी बाजूला घेतली अन्... भंडाऱ्यात पती पत्नीला ट्रकने चिरडलं

Bhandara News : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर-मोहाडी राज्य मार्गावरील खरबी येथे घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी ट्रक चालकाला अटक केली आहे.

Aug 28, 2023, 01:38 PM IST

13 हेअर पिन, 5 सेफ्टी पिन आणि 8 ब्लेड... तरीही वाचला तरुणाचा जीव, पण हे पोटात कसं गेलं?

Puducherry News : पुद्दुचेरी येथील रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने एका आजारी तरुणाच्या पोटातून 13 हेअरपिन, पाच सेफ्टी पिन आणि पाच रेझर ब्लेड सुरक्षितपणे बाहेर काढले आहेत. दोन तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर तरुणाला जीवनदान मिळालं आहे.

Aug 21, 2023, 01:45 PM IST

हैद्राबादच्या तरुणाचा काळू धबधब्यात बुडून मृत्यू; सहा दिवसांनी सापडला मृतदेह

Pune News : माळशेजमधील काळू धबधब्याजवळ पाय घसरुन एक पर्यटक बेपत्ता झाला होता. तरुणाचा बरेच दिवस शोध सुरु होता. पण तो सापडत नव्हते. या घटनेनंतर प्रशासनाने हा धबधबा पर्यटकांसाठी बंद केला आहे.

Aug 20, 2023, 12:44 PM IST

पाकिस्तानात धावत्या बसला भीषण आग; होरपळून 30 प्रवाशांचा जागीच मृत्यू

Paikstan Bus Accident : रविवारी पहाटे पाकिस्तानच्या पिंडी भटियानजवळ फैसलाबाद मोटरवेवर बसने पेट घेतल्याने 30 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले आहे.

Aug 20, 2023, 08:39 AM IST

दुर्दैव! विहीरीत बैल पडला म्हणून वाचवायला गेलेल्या 6 गावकऱ्यांचा जागीच मृत्यू

Jharkhand News : झारखंडमध्ये एका गावात घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. बैलाच्या वाचवण्याच्या नादात नऊ पैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफने तीन गावकऱ्यांना वाचवलं आहे.

Aug 19, 2023, 01:19 PM IST

भांडण सोडवता सोडवता गेला आरपीएफ जवानाचा जीव; रेल्वे फलाटावरच दुर्दैवी मृत्यू

Kasara Accident : कसारा रेल्वे स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. आरपीएफ जवानाच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Aug 13, 2023, 04:25 PM IST

वरंध घाटात पुन्हा अपघात; रस्ता चुकल्याने कार 40 फूट खोल दरीत कोसळली

Pune Accident : नेहमीच चर्चेत असलेल्या वरंध घाटात पुन्हा एकदा अपघात झाला आहे. दाट धुके आणि रस्ता चुकल्याने वरंध घाटात एका चारचाकी थेट दरीत कोसळली आहे. गाडीमध्ये तीन प्रवासी होते.

Aug 13, 2023, 11:02 AM IST

सातारा येथे विचित्र अपघात; 15 मिनिटांत चौघांचा जीव वाचला

सातारा यथे वाहत्या पाण्याच्या प्रवाहात कार कोसळली. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून प्रवासी सुखरुप बचावले आहेत. 

Aug 12, 2023, 07:36 PM IST

देवदर्शनासाठी निघालेल्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू; साताऱ्यात भीषण अपघात

Satara News : साताऱ्यात भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेले भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. 

Aug 10, 2023, 09:45 AM IST