सातारा येथे विचित्र अपघात; 15 मिनिटांत चौघांचा जीव वाचला

सातारा यथे वाहत्या पाण्याच्या प्रवाहात कार कोसळली. मात्र, नशिब बलवत्तर म्हणून प्रवासी सुखरुप बचावले आहेत. 

Updated: Aug 12, 2023, 08:41 PM IST
सातारा येथे विचित्र अपघात; 15 मिनिटांत चौघांचा जीव वाचला title=

Satara Accident News : सातारा येथे विचित्र अपघात घडला आहे. भरधाव वेगात असलेली कार  कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात कोसळली. कार मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नशिब बलवत्तर म्हणून त्यांना वेळीच मदत मिळाली. अवघ्या 15 मिनीटांत या प्रवाशांचा जीव वाचला आहे. वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशी प्रतिक्रिया या दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी दिली आहे.  

कसा झाला अपघात

साताऱ्यातील खंबाटकी घाटा जवळ हा अपघात घडला आहे. खंबाटकी घाटाजवळ असलेल्या कॅनॉल मध्ये भरधाव वेगात असलेली कार कोसळली. या कारमधून चार जण प्रवास करत होते. ही कार कॅनॉलमध्ये कोसळल्याचे स्थानिकांनी पाहिले. कॅनॉलमध्ये कोसळलेली कार पाण्यात बुडून पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागली. या कारमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कारच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. स्थानिक तात्काळ प्रवाशांच्या मदतीसाठी धावून आले.

15 मिनिटांत जीव वाचला

पुण्यातील भोरच्या चार युवकांनी कॅनॉलमध्ये वाहून जात असलेल्या कारमधील 5 प्रवास्यांचे प्राण वाचविले आहेत. प्रवाशांमध्ये 1 महिला, 2 पुरुष आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे.  पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकीघाटा दरम्यान असणाऱ्या धोम बलकवडी कॅनॉलमध्ये, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून ईर्टिका कार कॅनॉलमध्ये पडल्याची घटना घडली. त्यानंतर जीवाची बाजी लावून युवकांनी प्रवास्यांचे प्राण वाचविलेत. प्रसाद पांडुरंग गोळे, अक्षय कांबळे, लक्ष्मण जगताप, सचिन माने अशी युवकांची नावे आहेत. हा सर्व थरार मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय. युवकांच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होतंय.

खंबाटकीघाट ता.खंडाळा जि सातारा येथे रस्त्याने जाणाऱ्या कारच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून कार  रस्त्या शेजारी आसलेल्या वाहत्या कॅनॉल मध्ये पडली.  कॅनॉलमध्ये वाहते पाणी असल्याने कार वाहू लागली. कार मध्ये पाचजण प्रवास करत होते.त्यात एक दोन पुरुष एक महिला व दोन अल्पवयीन मुले होती. वेदांत कंपनीतील कामगार कंपनीच्या टेरेस्टवर जेवण करत असताना ही घटना दिसली. लागलीच ते कामगार घटनास्थळी पोहचले. याच वेळी कार वाहत जात असताना कंपनीच्या आणि स्थानिक तरुणांना कार मधील सर्वांना सुखरूप बाहेर काढून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रसाद पांडुरंग गोळे (शिंद भोर) वेदांत इक्विप सेल्स अँड सर्व्हिस  खंडाळा या कंपनीतील मधील अक्षय कांबळे, लक्ष्मण जगताप, सचिन माने व सहकारी, आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांनी एर्टिका गाडीतील पाच जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. भोर तालुक्यातील प्रसाद गोळे व सहकार्यांनी कौतुकास्पद कार्य केले असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

स्थानिकांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला

पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवल्याने चौघांचे जीव वाचवण्यात यश आले आहे. क्रेन लावून या कारमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आले आहे.चालकाचा ताबा सुटल्याने कार कॅनॉलमध्ये कोसळली होती. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. 

कार विहिरीत पडून एकाचा मृत्यू 

सातारा जिल्ह्यातील विहे इंथ कार विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार 25 ते 30 फूट खोल पाण्यात पडली. 

खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात

सांगलीमध्ये खासगी बस आणि कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. विटा इथल्या सातारा रस्त्यावर हा भीषण अपघात झाला होता. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एक महिला ठार झाली होती. सर्वजण तासगाव तालुक्यातील गव्हाण इथले एकाच कुटुंबातील रहिवासी आहेत.