दिल्ली विधानसभा निवडणूक: भाजपची ६२ उमेदवारांची लिस्ट

भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ६२ उमेदवारांची यादी मध्यरात्री जाहीर केलीय. भाजपचे महासचिव आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी पक्षाचे ६२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. 

Updated: Jan 20, 2015, 02:09 PM IST
दिल्ली विधानसभा निवडणूक: भाजपची ६२ उमेदवारांची लिस्ट title=

नवी दिल्ली: भाजपनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ६२ उमेदवारांची यादी मध्यरात्री जाहीर केलीय. भाजपचे महासचिव आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी पक्षाचे ६२ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. 

भाजपनं नवी दिल्ली सीटहून केजरीवाल यांच्या विरुद्ध नवा चेहरा नुपूर शर्मा तिकीट दिलंय. तर पटपडगंजमधून मनीष सिसोदिया विरोधात विनोद कुमार बिन्नी यांना उमेदवारी दिलीय.

भाजपच्या लिस्टमध्ये अनेक नामवंत चेहरे आहेत. त्यात माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस सोडून नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या कृष्णा तीरथ यांचंही नाव आहे. त्या पटेल नगर (एससी) सीटमधून निवडणूक लढवतील.

दिल्लीचे माजी मंत्री जगदीश मुखी जनकपुरीमधून तर दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष विजेंद्र गुप्ता रोहिणी सीटमधून निवडणूक लढवतील. 

नावांची यादी जाहीर करतांना नड्डा म्हणाले, पक्षाचे दिल्लीचे अध्यक्ष सतीश उपाध्याय निवडणूक लढणार नाहीत कारण त्यांच्या नेतृत्वात निवडणूक होतेय आणि त्यांच्यावर खूप जबाबदारी आहे. 

भाजपच्या ६२ उमेदवारांच्या नावाची यादी - 

  • कृष्णानगर - किरण बेदी
  • नरेला - नीलदमन खत्री
  • बुराड़ी- गोपाल झा
  • तिमारपूर- रजनी अब्बी
  • आदर्शनगर- रामकिशन सिंघल
  • बादली- राजेश यादव
  • रिठाला - कुलवंत राणा
  • बवाना - जगन सिंह
  • मुंडका - आजाद सिंह
  • किराड़ी- अनिल झा
  • सुलतानपुर माजरा (सु) - प्रभुदयाल साय
  • नांगलोई - जाट मनोज शौकीन
  • मंगोलपुरी (सु) - सुरजीत
  • रोहिणी- विजेन्द्र गुप्ता
  • शालीमार बाग - रेखा गुप्ता
  • शकूरबस्ती - डॉ. एससी वत्स
  • त्रिनगर - डॉ. नंदकिशोर गर्ग
  • वजीरपुर - डॉ. महेंद्र नागपाल
  • मॉडल टाउन - विवेक गर्ग
  • सदर बाजार - प्रवीन जैन
  • चांदनी चौक - सुमन कुमार गुप्ता
  • मटिया महल - अंजुमन देहलवी
  • बल्लीमरान - श्याम मोरवाल
  • करोलबाग(सु) - योगेंद्र चंदोलिया
  • पटेलनगर (सु) - कृष्णा तीरथ
  • मोती नगर - सुभाष सचदेवा
  • मादीपूर(सु) - राजकिशोर फुलवारिया
  • तिलकनगर - राजीव बब्बर
  • जनकपूरी - जगदीश मुखी
  • उत्तमनगर - पवन शर्मा
  • द्वारका प्रद्युम्न - राजपूत
  • मटियाला राजेश - गहलोत
  • नजफगढ़ - अजीत खरखरी
  • बिजवासन - संत प्रकाश राणा
  • दिल्ली कँट - करण सिंह तंवर
  • राजेन्द्र नगर - सरदार आरपी सिंह
  • नवी दिल्ली - नुपूर शर्मा
  • जंगपुरा -एमएस धीर
  • कस्तूरबा नगर- रविंद्र चौधरी
  • आर के पुरम - अनिल शर्मा
  • छतरपुर - बहराम सिंह तंवर
  • देवली(सु) - अरविन्द कुमार
  • आंबेडकर नगर(सु) - अशोक चौहान
  • संगम विहार - एससीएल गुप्ता
  • तुगलकाबाद - विक्रम बिधुड़ी
  • बदरपूर - रामबीर बिधुड़ी
  • ओखला - ब्रह्म सिंह बिधुड़ी
  • त्रिलोकपुरी(सु) - किरण विद्या
  • कोंडली(सु) - हुकुम सिंह
  • पटपड़गंज - विनोद कुमार बिन्नी
  • लक्ष्मीनगर- बी. बी. त्यागी
  • विश्वास नगर - ओ. पी. शर्मा
  • कृष्णानगर - किरण बेदी
  • गांधी नगर - जितेंद्र चौधरी
  • सीमापूरी(सु) - करमवीर चंदेल
  • रोहताश नगर - जितेन्द्र महाजन
  • सिलमपूर - संजय जैन
  • घोंडा - साहिब सिंह चौहान
  • बाबरपूर - नरेश गौड़
  • गोगलपूर(सु) - रंजीत कश्यप
  • मुस्तफाबाद - जगदीश प्रधान
  • करावल नगर - मनमोहन सिंह बिष्ट

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.