एक वादग्रस्त कॅच, ज्यानं क्रिकेटमध्ये माजला गोंधळ!

बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर आणि मेलबर्न स्टार दरम्यान खेळल्या गेलेल्या एका मॅचमध्ये घेतलेल्या एका कॅचनं क्रिकेट जगाला विचारात पाडलं की ही कॅच आणि की सिक्सर. या कॅचबद्दल अनेक दिग्गजांचे वेगवेगळे मतं आहेत. कोणी कॅच म्हटलं तर कुणी सिक्स. आयसीसीनं मात्र याला कॅच मानत बॅट्समनला आऊट घोषित केलं.

Updated: Jan 20, 2015, 12:43 PM IST
एक वादग्रस्त कॅच, ज्यानं क्रिकेटमध्ये माजला गोंधळ! title=

नवी दिल्ली: बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर आणि मेलबर्न स्टार दरम्यान खेळल्या गेलेल्या एका मॅचमध्ये घेतलेल्या एका कॅचनं क्रिकेट जगाला विचारात पाडलं की ही कॅच आणि की सिक्सर. या कॅचबद्दल अनेक दिग्गजांचे वेगवेगळे मतं आहेत. कोणी कॅच म्हटलं तर कुणी सिक्स. आयसीसीनं मात्र याला कॅच मानत बॅट्समनला आऊट घोषित केलं.

कॅच मागणी गोष्ट -

मेलबर्नचा कॅप्टन कॅमरून व्हाइटनं नॅथन हॉरिट्सच्या बॉलवर एक स्लॉग स्वीप खेळला. बॉल बॅटवर पडल्यानंतर हवेत गेला आणि सीमारेषाजवळ सिडनीचा जोश लेलॉरनं जबरदस्त उडी मारून बाउंड्रीच्या आत उडी घेऊन पुन्हा सीमारेषेच्या आत मैदानात येऊन कॅच घेतली. 

या पद्धतीनं आऊट झाल्यानंतर बॅट्समन नाराज झाला आणि त्यानं कॅचवर मत दिलं. व्हाइटनं म्हटलं, "नियमांनुसार हा सिक्सर असायला गवा. जेव्हा बॉलरनं  बॉलला अखेरचा हात लावला तेव्हा तो बाऊंड्री लाइनच्या बाहेर होता. यानंतर बॉल फेकल्या गेला, अशात मी आऊट द्यायला नको होतं."

का झाला वाद -

जोशनं ही कॅच पहिले बाऊंड्रीच्या आधी घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो अयशस्वी झाला. बॉल बाऊंड्रीकडे गेला तेव्हा जोशनं पण बाऊंड्रीच्या आत उडी घेतली आणि बाऊंड्री बाहेर बॉल फेकून मैदानात येवून कॅच घेतली. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.