अखेर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यापाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातही आता दारूबंदी जाहीर झालीय. त्यामुळं हा पट्टा आता दारूमुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Updated: Jan 20, 2015, 03:38 PM IST
अखेर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय title=

मुंबई: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यापाठपोठ विदर्भातल्या चंद्रपूर जिल्ह्यातही आता दारूबंदी जाहीर झालीय. त्यामुळं हा पट्टा आता दारूमुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

भाजपा सरकारातील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक लढवताना चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं, ते सरकारनं पाळल्याचं दिसत आहे.
गेली पाच वर्षे दारूपोटी हजारो संसार उध्वस्त झाले असून जवळपास एक लाख सह्यांची मोहीम महिलांनी राबवली होती. त्यासाठी महिलांनी मुंडन आंदोलन केलं होतं. 

तसंच ६०० ग्रामपंचायतींनी दारूबंदीचा प्रस्ताव मंजूर केला होता. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास सातशे कोटी रुपयांची दारू दर वर्षाला रिचवली जात होती. यावरून या निर्णयाची व्याप्ती आणि त्याचा महसूलावर होणारा परिणाम दिसून येतो.

शासनाचा निर्णय योग्य असून स्वागत आणि अभिनंदन करण्यासारखा असल्याचं मत अभय बंग आणि विकास आमटे यांनी केले आहे. तसंच या निर्णयाची अंमलबजावणी कशी केली जाते. हे बघणं महत्त्वाचं असल्याचं बंग आणि आमटे म्हणाले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.