तालिबाननं केली ब्रिटनीच्या एक्स बॉयफ्रेंडची हत्या

पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सचा एक्स बॉयफ्रेंड जॉन सुंडेलचा अफगानिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार ४४ वर्षीय जॉन पायलट होते आणि अफगानिस्तानात खाजगी क्रॉन्ट्रॅक्टवर काम करत होते.

Updated: Jan 19, 2015, 02:19 PM IST
तालिबाननं केली ब्रिटनीच्या एक्स बॉयफ्रेंडची हत्या title=

अफगानिस्तान: पॉप स्टार ब्रिटनी स्पीयर्सचा एक्स बॉयफ्रेंड जॉन सुंडेलचा अफगानिस्तानमध्ये तालिबानच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार ४४ वर्षीय जॉन पायलट होते आणि अफगानिस्तानात खाजगी क्रॉन्ट्रॅक्टवर काम करत होते.

तालिबाननं मिसाइलनं त्यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ला केला होता. ज्यात तो मारला गेला. सुंडेलनं ब्रिटनी स्पीयर्सला नशेचं व्यसन सोडविण्यात खूप मदत केली होती. २००७मध्ये दोघांचं नातं खूप चांगलं होतं. मात्र जास्त दिवस ते टिकू शकलं नाही. या दोघांची पहिली भेट दारू सोडविण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात झाली होती.

जॉनचे भाऊ कार्ल यांनी सांगितलं, ""ही घटना खूप दु:ख देणारी आहे. तो अफगानिस्तानात लोकांना मदत करत होता. जॉन नेहमी सांगायचा देशात सध्या खूप उलथा-पालथ सुरू आहे."

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.