24taas

नितीश कुमारांवर टीकास्त्र, मी अजूनही बिहारचा मुख्यमंत्री - मांझी

बिहारमधील राजकीय संघर्षाचं केंद्र आता दिल्लीत हललं असून बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांझी यांनी नितीशकुमार सत्तेशिवाय राहू शकत नाही अशी घणाघाती टीका करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Feb 8, 2015, 08:33 PM IST

सहा दशकांनंतर लढ्याला यश, मराठीला अभिजात दर्जा!

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे. साहित्य अकादमीनं केंद्रसरकारला याबाबत एक पत्र पाठवलंय. २७ फेब्रुवारी या ‘मराठी भाषा दिना’पूर्वी याची घोषणा होणार आहे. 

Feb 8, 2015, 07:13 PM IST

व्हिडिओ: सावंतवाडीत रंगली ‘वराह’लीला!

सावंतवाडी मोती तलावात रानडुक्कर पडल्यानं बाजारपेठेत अनेकांची धांदल उडाली. या रानडुकराच्या हल्ल्यात ३ महिला जखमी झाल्यात तर काही गाड्यांचही नुकसान झालंय. 

Feb 8, 2015, 06:45 PM IST

टीम इंडियाची हाराकिरी सुरूच, प्रॅक्टिस मॅचही गमावली

ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून वर्ल्डकपपूर्वीच्या प्रॅक्टिस मॅचमध्येहीतही ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३७२ धावांचं लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला. भारताचे सात फलंदाज फक्त १०८ धावांमध्येच माघारी परतले आहेत.

Feb 8, 2015, 06:25 PM IST

धक्कादायक: रोहतकमध्ये निर्भया बलात्काराची पुनरावृत्ती

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणासारखीच अंगावर शहारे आणणारी घटना रोहतकमध्ये घडली आहे. अज्ञात नराधमांनी २८ वर्षाच्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीची बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना रोहतकमध्ये घडलीय. एवढंच नव्हे तर  बलात्कारानंतर नराधमांनी पिडीत तरुणीच्या गुप्तांगामध्ये छोटी खडी टाकून ठेवल्याचं समोर आलं आहे. या संतापजनक घटनेची दखल महिला आयोगानं घेतली असून महिला आयोगानं रोहतक पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. 

Feb 8, 2015, 06:03 PM IST

जागतिक ट्रेंड: सोन्यात घट तर चांदी स्थिर

राजधानी दिल्लीच्या सराफ्यात शुक्रवारी सोन्याचा भाव १०० रुपयांनी घटून २८,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्माते यांच्या मागणीत घट झाल्यानं चांदीचा भावही २५० रुपयांनी घटून ३८,३५० रुपये प्रतिकिलो राहिला.

Feb 8, 2015, 05:03 PM IST

'षमिताभ' (रिव्ह्यू ) : अमिताभ आणि धनुषनं जिंकलं!

'चीनी कम' आणि 'पा' सारखे जबरदस्त चित्रपट देणारे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी बॉलिवूडला पुन्हा एक दमदार चित्रपट दिलाय. 'षमिताभ'च्या रुपात बाल्कीनं एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांसमोर आणलाय. जर चांगली भूमिका असेल तर आपण त्याला चार चाँद लावू शकतो, हे महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय. तर दुसरीकडे अक्षरा आणि धनुषही आपल्या अभिनयाद्वारे सर्वांचं कौतुक मिळवलं.

Feb 8, 2015, 04:36 PM IST

आमचा व्हिडिओ पाहण्याची सक्ती नाही, 'AIB'नं सोडलं मौन

अश्लिल विनोद, शेरेबाजी आणि टिप्पणीमुळं वादात सापडलेल्या एआयबी नॉकआऊट्स या शोनं पहिल्यांदाच या विषयावर भाष्य केलंय. 

Feb 5, 2015, 01:45 PM IST