टीम इंडियाची हाराकिरी सुरूच, प्रॅक्टिस मॅचही गमावली

ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून वर्ल्डकपपूर्वीच्या प्रॅक्टिस मॅचमध्येहीतही ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३७२ धावांचं लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला. भारताचे सात फलंदाज फक्त १०८ धावांमध्येच माघारी परतले आहेत.

Updated: Feb 8, 2015, 06:25 PM IST
टीम इंडियाची हाराकिरी सुरूच, प्रॅक्टिस मॅचही गमावली   title=

अॅडिलेड: ऑस्ट्रेलियात भारताची पराभवाची मालिका सुरुच असून वर्ल्डकपपूर्वीच्या प्रॅक्टिस मॅचमध्येहीतही ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३७२ धावांचं लक्ष्य गाठताना भारताचा डाव २६५ धावांवर आटोपला. भारताचे सात फलंदाज फक्त १०८ धावांमध्येच माघारी परतले आहेत.

वर्ल्डकपपूर्वी आज अॅडिलेडमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात प्रॅक्टिस मॅच रंगली. या मॅचला अधिकृत दर्जा नसला तरी भारताच्या दृष्टीनं ही मॅच महत्त्वाची होती. टेस्ट सीरिज आणि त्यानंतरच्या ट्राय सीरिजमधील कटू आठवणी विसरुन विश्वचषकापूर्वी विजय मिळवून मनोबल वाढवण्याची संधी भारतीय संघाकडे होती. 

मात्र या मॅचमध्ये भारताचे बॉलर्स आणि बॅट्समन दोघंही सपशेल अपयशी ठरले. बॉलर्सच्या निष्प्रभ माऱ्यामुळं ऑस्ट्रेलियानं ४८.२ ओव्हरमध्ये सर्व गडी गमावत ३७१ धावांचा डोंगर उभा केला होता. हे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेले भारतीय बॅट्समनही निराशाजनक कामगिरी करुन माघारी परतले. 

सलामीवीर रोहित शर्मा आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेला विराट कोहली अनुक्रमे ८ आणि १८ रन्सवर आऊट होऊन माघारी परतले. यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अजिंक्य रहाणेनं शतकी भागीदारी करत भारताला १५० टप्पा ओलांडून दिला. भारताच्या १५७ रन्स झाले असताना रहाणे (६६ रन्स) बाद झाला. त्यानंतर १७२ रन्सवर असताना धवन ५९ रन्सवर आऊट झाला. 

यानंतर भारतीय बॅट्समननी बेजबाबदार फटकेबाजी करत विकेट गमावल्या. रैना ९ रनवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात रनआऊट झाला. तर महेंद्रसिंग धोनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. धोनीला भोपळाही फोडता आला नाही. स्टुअर्ट बिन्नीही ५ रन्सवर आऊट झाला. अंबाटी रायडू (५३ रन्स) आणि रविंद्र जडेजा (२० रन्स) या जोडीनं भारताला २५० रन्सचा टप्पा गाठून दिला. अक्षर पटेव आणि आर. अश्विनही स्वस्तात आऊट झाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.