व्हिडिओ: सावंतवाडीत रंगली ‘वराह’लीला!

सावंतवाडी मोती तलावात रानडुक्कर पडल्यानं बाजारपेठेत अनेकांची धांदल उडाली. या रानडुकराच्या हल्ल्यात ३ महिला जखमी झाल्यात तर काही गाड्यांचही नुकसान झालंय. 

Updated: Feb 8, 2015, 06:45 PM IST
व्हिडिओ: सावंतवाडीत रंगली ‘वराह’लीला! title=

सावंतवाडी: सावंतवाडी मोती तलावात रानडुक्कर पडल्यानं बाजारपेठेत अनेकांची धांदल उडाली. या रानडुकराच्या हल्ल्यात ३ महिला जखमी झाल्यात तर काही गाड्यांचही नुकसान झालंय. 

तलावाच्या बाजुलाच असलेल्या नरेंद्र डोंगरातून हा रानडुक्कर बाजारपेठेत घुसला. गर्दी पाहून बिथरलल्यानं तो तलावात पडला. वनकर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं जाळं टाकून या रानडुकराला पकडलं मात्र जाळं तोडून तो सैरावैरा पळू लागला.

दरम्यान त्यानं एका महिलेच्या पायाला चावा घेतला. अखेर या रानडुकराला वनकर्मचाऱ्यांनी जेरबंद केलं आणि जंगलात सोडून दिलं. मात्र तब्बल चार तास चाललेल्या या वराहलीलेमुळं सावंतवाडीकरांना चांगलंच दमवलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.