सर्व्हिस टॅक्स

रेल्वे ई-तिकीटवर नाही लागणार सर्व्हिस टॅक्स

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. पण पहिल्यांदाच अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेट एकत्र सादर होत आहे. अरुण जेटली यांनी घोषणा केली आहे की, आता IRCTC वरुन E-तिकीट बुक केल्यास सर्विस टॅक्स नाही द्यावा लागणार. यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Feb 1, 2017, 12:50 PM IST

सर्व्हिस टॅक्स वाढवल्यामुळे या गोष्टी महाग

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं आहे. या बजेटमध्ये जेटलींनी सर्व्हिस टॅक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ केली आहे. 

Feb 29, 2016, 02:14 PM IST

बजेट आधी मोदी सरकारनं दिली खुषखबर

देशाचं आर्थिक बजेट सादर व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. पण त्याआधी मोदी सरकारनं नागरिकांना खुषखबर दिली आहे.

Feb 25, 2016, 02:23 PM IST

रेस्टॉरन्ट, हॉटेल्सचा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' नाही!

रेस्टॉरन्ट, हॉटेल्स आणि इतर भोजनालयांमध्ये जेवायला गेल्यानंतर तुम्ही पदार्थांशिवाय वाढीव 'सर्व्हिस चार्ज' भरला असेल तर थांबा... हा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' असेल जो सरकारकडे जात असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.

Jul 15, 2015, 10:54 AM IST

आजपासून तुमचं बजेट कोलमडणार, सर्व्हिस टॅक्स १४% लागू होणार

भाजप सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन १४ टक्के सेवाकराची उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळं आजपासून सर्वसामान्यांचा महिन्याचा अर्थसंकल्प कोलमडण्याची शक्यता आहे. 

May 31, 2015, 01:25 PM IST

1 जूनपासून बिघडेल आपलं बजेट,14 टक्के सर्व्हिस टॅक्स होणार लागू

बजेट 2015-16मध्ये सर्व्हिस टॅक्समध्ये वाढ करण्यात आलीय. 12.36 वरुन 14 टक्के सर्व्हिस टॅक्स करण्यात आला. 1 जूनपासून हा नवा सर्व्हिस टॅक्स लागू होणार आहे. त्यामुळं आता रेस्टॉरंटमधील जेवण, विमा क्षेत्र आणि फोन बिल सारख्या गोष्टी महागणार आहेत.

May 20, 2015, 02:08 PM IST

'एप्रिल फूल' नाही, महागाईचं वास्तव!

'एप्रिल फूल' नाही, महागाईचं वास्तव!

Apr 1, 2015, 02:24 PM IST

पाहा आजपासून काय होतंय स्वस्त आणि काय महाग!

अर्थसंकल्प २०१५-१६मध्ये घोषित केला गेलेल्या सर्व्हिस टॅक्स बदलानंतर आता प्राणीसंग्रहालय, अभयारण्यांमधील प्रवेश तिकीट स्वस्त होणार आहेत. तर बिझनेस क्लासमध्ये विमान प्रवास, म्युचुअल फंड आणि चिटफंडमधील गुंतवणूक महागणार आहे.

Apr 1, 2015, 10:05 AM IST

युवराजला दणका, इन्कम टॅक्सचा ससेमिरा...

केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने युवराज सिंगला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये युवराजला सहारा एडवेंचर स्पोर्ट्स जाहिरातीपासून मिळालेल्या इन्कममधील ४६ लाख ६० हजार रूपयांचा कर द्यायला सांगितला आहे.

May 8, 2014, 05:31 PM IST

सेलिब्रेटी सर्व्हिस टॅक्स भरणारे आणि बुडवणारे

२०१०पासून लागू झालेला सर्व्हिस टॅक्स अनेक बॉलिवूड कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींनी थकवलाय. सर्व्हिस टॅक्ससाठी एकूण १८ लाख लोकांनी नोंदणी केलीय. मात्र त्यातले फक्त सात लाख लोकं नियमित सर्व्हीस टॅक्स भरतात. गेल्यावर्षी मुंबईतून ४६ हजार कोटी सर्व्हिस टॅक्स भरला गेला.

Feb 5, 2014, 03:49 PM IST

विवेक ओबेरॉयनं थकवला ५० लाखांचा सर्व्हिस टॅक्स

अभिनेता विवेक ओबेरॉयविरूद्ध सर्व्हिस टॅक्स थकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक ओबेरॉयनं चित्रपट निर्माते आणि चित्रपट निर्मिती कंपन्यांकडून पैसे घेतले, त्यासोबत सर्व्हिस टॅक्सचीही आकारणी केली. मात्र हा सर्व्हिस टॅक्स त्यानं सेवा कर संचालनालयाकडं भरलाच नसल्याचं उघड झालंय.

Sep 19, 2013, 04:30 PM IST

रामगोपाल वर्मा टॅक्स अधिकाऱ्यांच्या जाळ्यात!

सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या कार्यालयावर सर्व्हिस टॅक्स विभागानं धाड टाकलीय.
मुंबईत ओशिवरास्थित रामगोपाल वर्मा फिल्म्स फॅक्टरीच्या कार्यालयात सर्व्हिस टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळजवळ आठ तासांपेक्षा जास्त वेळ तपासणी केलीय.

Sep 12, 2013, 04:11 PM IST