रेस्टॉरन्ट, हॉटेल्सचा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' नाही!

रेस्टॉरन्ट, हॉटेल्स आणि इतर भोजनालयांमध्ये जेवायला गेल्यानंतर तुम्ही पदार्थांशिवाय वाढीव 'सर्व्हिस चार्ज' भरला असेल तर थांबा... हा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' असेल जो सरकारकडे जात असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.

Updated: Jul 15, 2015, 10:54 AM IST
रेस्टॉरन्ट, हॉटेल्सचा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' नाही! title=

नवी दिल्ली : रेस्टॉरन्ट, हॉटेल्स आणि इतर भोजनालयांमध्ये जेवायला गेल्यानंतर तुम्ही पदार्थांशिवाय वाढीव 'सर्व्हिस चार्ज' भरला असेल तर थांबा... हा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' असेल जो सरकारकडे जात असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.

अर्थ मंत्रालयानं नुकतंच एक पत्रक काढून हे जाहीर केलंय. काही रेस्टॉरन्ट आणि हॉटेल्समध्ये खाद्य पदार्थांच्या बिलाशिवाय सर्व्हिस चार्ज लावला जातो. हा सर्व्हिस चार्ज हा त्यांनाच जातो. काही ग्राहकांचा हा समज चुकीचा आहे की हा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' आहे हो कररुपात सरकारकडे जातो... पण, तो 'सर्व्हिस टॅक्स' नाही, असं या पत्रकात म्हटलं गेलंय.

रेस्टॉरन्टनं किंवा हॉटेल्सकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या एसी, सेंट्रल एअर हिटींग अशा सेवांसाठी वसून केलेल्या एकूण किंमतीवर सर्व्हिस टॅक्स 5.6 टक्के असेल.

14 टक्क्यांचा सर्व्हिस टॅक्सचा नवे दर 1 जूनपासून लागू झालेत. त्यामुळे, रेस्टॉरन्ट, इन्शुरन्स, फोन बिल तसंच इतर वस्तूही महाग झाल्यात. 

 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.