नवी दिल्ली: भाजप सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन १४ टक्के सेवाकराची उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळं आजपासून सर्वसामान्यांचा महिन्याचा अर्थसंकल्प कोलमडण्याची शक्यता आहे.
उपहारगृह, खानपान, रेल्वेप्रवास, मनोरंजन, उद्यानांत रपेट किंवा सांगीतिक-सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जादा दाम मोजावे लागणार आहेत.
सरकारी तिजोरीत महसुलात वाढ व्हावी म्हणून सेवाकर १२ टक्क्यांहून १४ टक्क्यांवर नेण्यात आलाय. त्यामुळं अनेक सेवा महागणार आहेत
एक नजर टाकूयांत उद्यापासून महाग होणाऱ्या सेवांवर...
१) ऑनलाईन खरेदी
२) हॉटेलिंग
३) सिनेमाचं तिकीट
४) रेल्वे विमान सेवा
५) मोबाईल बिल
६) वीज बिल
७) विमा हप्त्यामध्येही मोठी वाढ होईल
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.