सेलिब्रेटी सर्व्हिस टॅक्स भरणारे आणि बुडवणारे

२०१०पासून लागू झालेला सर्व्हिस टॅक्स अनेक बॉलिवूड कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींनी थकवलाय. सर्व्हिस टॅक्ससाठी एकूण १८ लाख लोकांनी नोंदणी केलीय. मात्र त्यातले फक्त सात लाख लोकं नियमित सर्व्हीस टॅक्स भरतात. गेल्यावर्षी मुंबईतून ४६ हजार कोटी सर्व्हिस टॅक्स भरला गेला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 5, 2014, 03:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२०१०पासून लागू झालेला सर्व्हिस टॅक्स अनेक बॉलिवूड कलाकार आणि मोठ्या उद्योगपतींनी थकवलाय. सर्व्हिस टॅक्ससाठी एकूण १८ लाख लोकांनी नोंदणी केलीय. मात्र त्यातले फक्त सात लाख लोकं नियमित सर्व्हीस टॅक्स भरतात. गेल्यावर्षी मुंबईतून ४६ हजार कोटी सर्व्हिस टॅक्स भरला गेला.
यावर्षी हा आकडा ६० हजार कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे. बॉलिवूडमधून एक हजार कोटींचा सर्व्हिस टॅक्स भरला जातो. मात्र असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी टॅक्स थकवलाय. कर थकवलेल्या कलाकारांना नोटीस बजावण्यात आलीय.
यांनी चुकवला सर्व्हिस टॅक्स
> कपिल शर्मा, हास्य कलाकार
> नवज्योत सिद्धू, हास्य कलाकार/खासदार
> सनी देओल, अभिनेता
> सनी लिऑन, अभिनेत्री
> अनुराग कश्यप, दिग्दर्शक
> समीर कर्णिक, दिग्दर्शक
सर्व्हिस टॅक्स नियमीत भरणारे
> अमिताभ बच्चन
> अक्षय कुमार
> ह्रतिक रोशन
> शाहीद कपूर
> अजय देवगण
> प्रियांका चोप्रा
> आमिर खान
> सलमान खान

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.