आम्ही भांडू पण एकत्रच नांदू- शरद पवार

दोन्ही काँग्रेसमधल्या वादावर अखेर पडदा पडल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थातल्या वादाचा राज्यात किंवा केंद्रातल्या आघाडीवर परिणाम होणार नाही असं पवार म्हणालेत. तर मुख्यमंत्र्यांनीही आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचं सांगत वादावर पडदा टाकला आहे

Updated: Apr 23, 2012, 05:37 PM IST

www.24taas.com, नवी मुंबई

 

दोन्ही काँग्रेसमधल्या वादावर अखेर पडदा पडल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातल्या वादाचा राज्यात किंवा केंद्रातल्या आघाडीवर परिणाम होणार नाही असं पवार म्हणालेत. तर मुख्यमंत्र्यांनीही आघाडीत सर्वकाही आलबेल असल्याचं सांगत वादावर पडदा टाकला आहे. त्यामुळे ते एक पाऊल मागे गेल्याची चर्चा आहे.

 

 

विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप शिवसेनेच्या मदतीनं काही ठिकाणी झेडपीची अध्यक्षपदं  पटकावली.  उस्मानाबाद आणि ठाण्यात काँग्रेसनं शिवसेनेला मदत करत त्याचा वचपा काढला. यावरुन दोन्ही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एकमेकांवर तुटून पडले. पिचड आणि माणिकराव ठाकरे यांनी पररस्परांवर अशी टीका केल्यानं दोन्ही पक्षात वाद पेटला होता.  त्यामुळे आघाडी तुटण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

 

 

 

हा संघर्ष वाढेल असं दिसताच शरद पवारांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.  पवारांच्या वक्तव्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनीही दोन्ही काँग्रेसमध्ये आलबेल असल्याचं सांगितले.एकत्र संसार करणारे दोन्ही काँग्रेसचे नेते नेहमीच एकमेकांना पाण्यात पाहतात. एकमेकांत ते कितीही भांडले तरी तुटेपर्यंत ताणायचं नाही हे अनेक वर्ष सत्तेत राहिल्याने त्यांना माहित आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा  आला.

 

 

 

व्हिडिओ पाहा..

 

[jwplayer mediaid="87664"]