विधानसभेसाठी अर्ध्या जागा द्या... नाहीतर...!
जागावाटपाबाबत राष्ट्रवादीचा मान राखावा अन्यथा आणखी एक चांगला मित्र गमावण्याची वेळ काँग्रेसवर येईल असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादीनं काँग्रेसला दिलाय.
Jul 22, 2014, 05:11 PM ISTकाँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी संपुष्टात
गेल्या पाच वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी आता संपुष्टात आलीय. जम्मू-काश्मीरमध्ये येत्या वर्षाअखेर होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे.
Jul 20, 2014, 06:33 PM ISTनेता पुत्र उमेदवार नको- काँग्रेस कार्यकर्ते
Jul 17, 2014, 08:39 PM ISTभाजप पाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणी सुरू
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीपाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणीसाठी नागपूरात बैठक झाली. यासाठी दिल्लीहून पर्यवक्षेक आले होते. नेता पुत्र आपल्याला उमेदवार म्हणून चालणार नाहीत असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितलं. त्यामुळं आपला उमेदवार इम्पोर्ट केला जाणार नाही, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे.
Jul 16, 2014, 10:08 PM ISTनागपुरातील एकही जागा शिवसेनेला नको - तावडे
मुंबईला झालेल्या पक्षबैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे सेनेशी संबंध तोडत स्वबळावर लढण्याची भाषा केली. आता विदर्भातही तशीच मागणी पुढे येत आहे. नागपुरात सेनेसाठी एकही जागा सोडू नका अशी मागणी करण्यात आलीय.
Jul 15, 2014, 07:54 PM IST144 जागा हव्याच, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं स्पष्ट
विधानसभेच्या जागावाटपावरून काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. विधानसभेसाठी अजित पवारांनी केलेली 144 जागांची मागणी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, असं सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी फेटाळली होती.
Jul 9, 2014, 07:33 PM ISTभाजप विधानसभा निवडणूक गडकरींच्या नेतृत्वात लढवणार?
राज्याच्या विधानसभा निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केलीय. मुंबईत आज भाजप विस्तारित कार्यकारणीची बैठक होतेय. विशेष म्हणजे ही निवडणूक केंद्रीय दळणवळण मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात होण्याची शक्यता आहे. तसे संकेतच आज होणाऱ्या बैठकीच्या बॅनरमधून दिसतायेत. कारण पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंहाच्या फोटोनंतर बॅनरवर नितीन गडकरींचा फोटो झळकतोय.
Jul 3, 2014, 11:04 AM ISTनिवडणुकीपूर्वी नाशकात राज ठाकरे लागले कामाला
विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे मतं मागताना नाशिक मॉडेलचे दाखले देण्याची रणनीती मनसे आखतंय. त्यासाठीच नाशिकमध्ये मनसे झपाटून कामाला लागलीय. राज ठाकरे स्वतः नाशिकवर लक्ष ठेवून आहेत.
Jun 20, 2014, 09:57 PM ISTराष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात पुढील आठवड्यात फेरबदल - शरद पवार
राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळात पुढच्या आठवड्यात फेरबदल होणार आहेत. एवढंच नव्हे तर संघटना पातळीवरही बदल केले जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच दिलीय.
Jun 20, 2014, 06:38 PM ISTपंकजा मुंडे भाजपच्या कोअर कमिटीत येणार- फडणवीस
मुंबईत भाजपच्या राज्यातल्या कोअर कमिटीची बैठक झाली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक पार पडली. पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी सांगितलंय.
Jun 19, 2014, 05:55 PM ISTमुख्यमंत्री व्हायचंय मला! राज ठाकरेंमध्ये आमूलाग्र बदल
आगामी विधानसभा निवडणूक स्वतः लढण्याची तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जाहीर केल्यानंतर राज ठाकरेंनी स्वतःमध्ये अमूलाग्र बदल केलाय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांची पूर्ण लाईफस्टाईलच बदललीय. विधानसभा निवडणुकीत पक्षाची व्यूहरचना ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी बैठकांचा सपाटा लावलाय.
Jun 13, 2014, 07:45 PM ISTमोदी वादळानंतर....भावी मुख्यमंत्रीपदाची चर्चा, मनसेत चैतन्य
राज आणि उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षांमधून नावं येतायत. मात्र दिल्लीत हा प्रयोग यशस्वी करणा-या भाजपमध्ये याबाबत संभ्रम आहे. विनोद तावडेंनी गोपीनाथ मुंडेंचं नाव पुढे केलं असलं, तरी स्वतः मुंडे मात्र बॅकफुटवर आहेत. मुख्यमंत्री महायुतीचा असेल असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी सत्ता आल्यावर महायुतीची चर्चा होऊन मुख्यमंत्री कोण, हे निश्चित होईल, असं सांगितलंय.
Jun 1, 2014, 10:12 PM ISTनिवडणूक लढवणारे राज पहिले ठाकरे, उद्धवचं काय?
ठाकरे घराण्यात आजवर कोणीही निवडणूक लढवली नव्हती. सत्ता केंद्र ठाकरेंनी आपल्याकडे ठेवत राजकारण केलं. याला ना अपवाद ठरले बाळासाहेब ना त्यांची पुढची पिढी.
Jun 1, 2014, 10:46 AM ISTविधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटणार?
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोर जावं लागलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधला संघर्ष अजून संपलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आघाडी बाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं सांगत आघाडी राहीलच अशी शक्यता नसल्याचे संकेत दिलेत.
May 25, 2014, 09:30 PM ISTमराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीची घाई
मराठा आरक्षण प्रश्नावर आक्रमक व्हा, विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रश्न मार्गी लावून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करा, असे आदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले.
May 10, 2014, 10:58 PM IST