काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी संपुष्टात

गेल्या पाच वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी आता संपुष्टात आलीय. जम्मू-काश्मीरमध्ये येत्या वर्षाअखेर होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे. 

Updated: Jul 20, 2014, 06:34 PM IST
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी संपुष्टात title=

नवी दिल्ली: गेल्या पाच वर्षांपासून जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी आता संपुष्टात आलीय. जम्मू-काश्मीरमध्ये येत्या वर्षाअखेर होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे. 

८७ आमदार असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेची निवडणुकीच्या चालू वर्षाच्या अखेरीस होणार आहे. सध्या जम्मूत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची युती आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली. 

काँग्रेसच्या नेत्या अंबिका सोनी यांनी काँग्रेस सर्व जागांवर लढवणार अशी घोषणा केली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे युती संपुष्टात आल्याची घोषणा केली.

'१० दिवसांपूर्वी मी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीची भेट घेऊन आमच्या निर्णयाची माहिती दिली होती. त्यांनी दिलेल्या सहकाऱ्याबद्दल त्यांचे आभारही मानले असे अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

I met the Mrs Gandhi 10 days ago & thanked her for all her support. I conveyed NC's decision to fight the elections alone 1/n

— Omar Abdullah (@abdullah_omar) July 20, 2014

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.