मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीची घाई

मराठा आरक्षण प्रश्नावर आक्रमक व्हा, विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रश्न मार्गी लावून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करा, असे आदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 10, 2014, 11:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मराठा आरक्षण प्रश्नावर आक्रमक व्हा, विधानसभा निवडणुकीच्या आधी प्रश्न मार्गी लावून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करा, असे आदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिले.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी 2 महिने मिळणार आहेत. या कालावधीत मंत्र्यांनी जोमाने कामावे लागवे असे आदेश पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज झाली. यामध्ये पवारांनी लोकसभेच्या कामगिरीचा आढावा घेतला. प्रलंबित निर्णय लवकर घ्या, तसंच विधानसभा निवडणूक तयारीसाठी मंत्र्यांनी राज्यभर दौरे करावेत अशी सूचनाही त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्याआधीच महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकारी हालचाली सुरू असल्याचं समजतंय. विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी राष्ट्रवादीलाच आता मराठा आरक्षणाची घाई झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.