विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा - शरद पवार
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन महिने मिळणार आहेत. या कालावधीत मंत्र्यांनी जोमाने कामावे लागवे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना दिलेत.
May 10, 2014, 05:34 PM ISTछोटे राणे निवडणूक लढवणार नाही!
नितेश राणे यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय. ट्विटवरवरुन त्यांनी ही माहिती दिलीय.
Apr 27, 2014, 10:31 AM ISTपाच राज्यांतील विधानसभेत काँग्रेसला केवळ `ठेंगा`!
आज झालेल्या मतमोजणीनुसार, ४० पैकी २१ जागांचा बहुमताचा आकडा पार करून काँग्रेसनं मिझोरममध्ये विजयाची नोंद केलीय.
Dec 9, 2013, 05:03 PM ISTजनतेचा विश्वासघात करणाऱ्या काँग्रेसला शिक्षा - अण्णा हजारे
दिल्लीत काँग्रेसची जोरदार पिछेहाट झालीय. नवी दिल्लीत गेल्या १५ वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात येणार हे स्पष्ट झालंय.
Dec 8, 2013, 12:02 PM ISTनागपूरकर गडकरी फडकवणार दिल्लीत भाजपचा झेंडा?
दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपचे नेते नितीन गडकरींवर देण्यात आलीये. नितीन गडकरी सध्या कसा प्रचार करत आहेत, त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत, त्यांचा दिनक्रम कसा आहे. हे जाणून घेऊया...
Nov 30, 2013, 07:24 PM ISTराजस्थानच्या निवडणुकीत मुंबईकरांची प्रतिष्ठा पणाला!
राजस्थान विधानसभा निवडणुकीत अशोक गेहलोत आणि वसुंधरा राजे यांच्यासोबतच मुंबईकर गुरूदास कामत आणि किरीट सोमय्या यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Nov 28, 2013, 05:39 PM IST‘ओपिनिअन पोल’वर बंदी? काँग्रेसची मागणी, भाजपचा विरोध
देशात २०१४च्या लोकसभा निवडणुकांचा फिवर चढायला लागलाय. त्याआधी पाच राज्यांच्या निवडणुका होतायेत. त्यामुळं प्रसार माध्यमांकडून ओपिनिअन पोल घेतले जात आहेत. याच जनमत चाचण्यांवर बंदी घालावी का यासाठी निवडणूक आयोगानं सर्व पक्षांची मतं मागविली आहे. काँग्रेसनं ओपिनिअन पोलवर बंदीची मागणी केलीय तर भाजपनं याला विरोध केलाय.
Nov 5, 2013, 10:10 AM ISTदिल्ली मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून हर्ष वर्धनांचे नाव
दिल्ली काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार बांधनी केली आहे. मात्र, दिल्लीत अंतर्गत कलहाचे पडसादही पाहायला मिळालेत. १३ जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आपले राजीनामे देण्याचे अस्त्र बाहेर काढले आहे. हा वादंग माजी अध्यक्ष नितीन गडकरींच्या विरोधात असल्याचे दिसून आलेय. दरम्यान, आज विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून डॉ. हर्ष वर्धन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले
Oct 23, 2013, 02:16 PM ISTकर्नाटक निवडणूक : बेळगावमध्ये हाणामारी
बेळगावात दोन मराठी उमेदवारांत हाणामारी झालीये. बेळगावच्या दक्षिण मतदारसंघात ही हाणामारी झालीय. यात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या संभाजी पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून भाजपचे अभय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
May 5, 2013, 12:46 PM ISTकर्नाटकात शांततेत मतदान सुरू
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सुरूवात झाली. पहिल्या तीन तासात १५ ते २० टक्के मतदान झाल्याचे नोंद करण्यात आलेय.
May 5, 2013, 12:27 PM ISTहिमाचलमध्ये ७०% मतदान
हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी सत्तर टक्के मतदान झालं. राज्यातल्या सर्व 68 जागांसाठी 459 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजप सर्व जागा लढवत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे मैदानात उतरलीये. राष्ट्रवादीनं 12 जागांवर उमेदवार उभे केलेत.
Nov 4, 2012, 11:50 PM ISTहिमाचल विधानसभेसाठी आज मतदान
हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होतंय. एकूण ६८ जागांसाठी हे मतदान होतंय. यासाठी सुमारे ४६ लाख मतदार आहेत आणि तब्बल ४५९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.
Nov 4, 2012, 11:17 AM ISTगुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणूका जाहीर
गुजरात व हिमाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकांच्या तारीख निवडणूक आयोगाकडून आज जाहीर करण्यात आली. ४ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
Oct 3, 2012, 04:28 PM ISTमोदींच्या बालेकिल्ल्यात घुसून सोनियांचा भाजपवर हल्लाबोल
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलंय. नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात... राजकोटमध्ये जाऊन सोनियांनी प्रचारसभेत भाजपवपर जोरदार टीका केलीय.
Oct 3, 2012, 12:51 PM ISTमणिपूरमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता
मणिपूरमध्ये काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे सुरवातीपासूनच आघाडी घेत वर्चस्व मिळविण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने तिपाईमुखची जागा जिंकून आपली खाते उघडले आहे, तर १४ ठिकाणी आघाडी मिळविली आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये काँग्रेसने सत्ताकडे निर्विवाद एकहाती वाटचाल केली आहे. याठिकाणी विरोधकांचे पानीपत झाले आहे.
Mar 6, 2012, 11:47 AM IST