144 जागा हव्याच, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं स्पष्ट

विधानसभेच्या जागावाटपावरून काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. विधानसभेसाठी अजित पवारांनी केलेली 144 जागांची मागणी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, असं सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी फेटाळली होती. 

Updated: Jul 9, 2014, 07:33 PM IST
144 जागा हव्याच, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी केलं स्पष्ट title=

मुंबई: विधानसभेच्या जागावाटपावरून काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झालीय. विधानसभेसाठी अजित पवारांनी केलेली 144 जागांची मागणी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, असं सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मागणी फेटाळली होती. 

मात्र 144 जागा हव्यात, ही पक्षाची अधिकृत भूमिकाच आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. एवढंच नव्हे तर जागावाटपाच्या चर्चेसाठी लवकरात लवकर समन्वय समितीची बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केलीय. 

यापूर्वी लोकसभेचे निकाल लक्षात घेतले तर, राज्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची स्थिती मजबूत आहे, असं राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मागणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.