नागपुरातील एकही जागा शिवसेनेला नको - तावडे

मुंबईला झालेल्या पक्षबैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे सेनेशी संबंध तोडत स्वबळावर लढण्याची भाषा केली. आता विदर्भातही तशीच मागणी पुढे येत आहे. नागपुरात सेनेसाठी एकही जागा सोडू नका अशी मागणी करण्यात आलीय. 

Updated: Jul 15, 2014, 09:16 PM IST
नागपुरातील एकही जागा शिवसेनेला नको - तावडे title=

मुंबई: मुंबईला झालेल्या पक्षबैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे सेनेशी संबंध तोडत स्वबळावर लढण्याची भाषा केली. आता विदर्भातही तशीच मागणी पुढे येत आहे. नागपुरात सेनेसाठी एकही जागा सोडू नका अशी मागणी करण्यात आलीय. 

नागपूरमध्ये भाजप 5 तर शिवसेना 1 जागा लढवते. मात्र आता ही एक जागाही सोडण्याची भाजपची तयारी नाही. आज भाजपच्या कोअर कमिटीची पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. तत्पुर्वीच हा दावा केला गेलाय. 

विधानसभा निवडणूक अगदी दोन महिन्यांवर आलीय. त्यातच आता भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निवडणुकांबाबत चर्चा झाली. या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत गरज पडल्यास राज्यातल्या सर्व जागा लढवा अशी मागणी केलीय. 

पूर्व विदर्भातली आणि विशेषतः नागपूरमधली एकही जागा शिवसेनेला देऊ नये ही मागणी भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलीय. नागपूर लोकसभा मतदार संघातील पूर्व, पश्चिम, दक्षिण- पश्चिम, उत्तर आणि मध्य या जागाच्या भाजपच्या कोट्यात आहेत. तर दक्षिण नागपूर हा एकमेव मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात आहे. मात्र या मतदारसंघात गडकरींना 61,000 मतांची आघाडी मिळाली होती. 

त्यामुळं भाजप नेत्यांनी या जागेवरही आपलाच क्लेम ठेवलाय. विदर्भातल्या नेत्यांची ही आक्रमकता युतीसाठी मोठी अडचणीची ठरू शकते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.