वारी

आनंदवारी... विठू माऊलीच्या दर्शनाला!

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी... दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्षे सुरु आहे…

Jun 19, 2014, 03:51 PM IST

विठुराया अशीच कृपा ठेव, मुख्यमंत्र्याचे साकडे

यंदा राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे वारकरी समाधानी आहेत. त्यामुळे ‘विठुराया, अशीच कृपा असू दे’ असे गाऱ्हाणे घालणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठुरायाला साकडं घातलं.

Jul 19, 2013, 11:49 AM IST

विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांची सहपत्नीक महापूजा

पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.

Jul 19, 2013, 07:24 AM IST

पंढरपूर भक्तिरसात, १० लाख भाविक वैकुंठनगरीत

अवघं पंढरपूर आज भक्तिरसात न्हाऊन निघालय. तहानभूक हरपून विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक यंदा वैकुंठनगरीत दाखल झालेत. चंद्रभागेच्या तिरी लाखो वारक-यांचा मेळा जमला आहे.

Jul 19, 2013, 07:17 AM IST

वारी का?

विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात..

Jul 2, 2013, 10:55 AM IST

पुणेकरांना आज दिवसभर पालख्यांच्या दर्शनाचा लाभ!

विठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली.

Jul 2, 2013, 10:13 AM IST

उद्धव ठाकरेंनी घेतलं पालखीचं दर्शन!

विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामाला असेल.

Jul 1, 2013, 02:39 PM IST

ज्ञानोबा-तुकोबाच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान...

मोक्षाचं प्रवेशद्वार असलेली नगरी अर्थात आळंदी नगरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सज्ज झालीय. आज संध्याकाळी 4 वाजता पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होईल. आजचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम गांधीवाड्यात असणार आहे. या सोहळ्यासाठी त्यासाठी आळंदी देवस्थान ट्रस्टची तयारी पूर्ण झालीय. यंदा पहिल्यांदाच पालखीचा रथ हायटेक बनवण्यात आलाय.

Jun 30, 2013, 01:00 PM IST

विठूचा गजर, वारकऱ्यांचा `डीजे`!

काळाच्या पावलांबरोबर वारी आधुनिक होतेय. निवृत्तीनाथांच्या पालखीत हे बदललेलं चित्र पहायला मिळालं. निवृत्तीनाथांच्या पालखीत चक्क डीजे लावण्यात आला होता. विठ्ठलाच्या गाण्यावर आणि डीजेच्या तालावर वारकरी नाचत होते.

Jun 25, 2013, 09:23 PM IST

निवृत्तीनाथांच्या वारीला प्रथमच शासकीय सलामी

पंढरीच्या वारीप्रमाणे निवृत्तीनाथांच्या वारीला प्रथमच शासकीय सलामी मिळाली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने पालकमत्र्यांच्या उपस्थितीत यावर्षापासून या वारीत सहभागी होणाऱ्या विणेकऱ्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

Jun 23, 2013, 10:28 PM IST

आनंदवारी

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनियां ||
तुळसीहार गळा कासे पीतांबर | आवडे निरंतर तेंचि ध्यान ||
मकरकुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणि विराजित ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें ||

Jun 30, 2012, 11:26 AM IST

महाराष्ट्राच्या ‘बाबां’चं विठुरायाकडं साकडं...

शनिवारी मध्यरात्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्र्यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. पांडुरंगाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न झाली.

Jun 30, 2012, 11:03 AM IST

‘याचसाठी केला अट्टहास...’

ज्या क्षणांची लाखो वारकरी वाट पाहत होते तो दिवस आज उगवलाय. पंढरपूरच्या सावळ्या विठूरायाच्या दारात उभं राहून साजरं रुप डोळ्यात साठवणं हे एका क्षणात वारीचं सार्थक झाल्यासारखं असतं. त्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत.

Jun 30, 2012, 10:42 AM IST

फड दांम्पत्य ठरले ‘मानाचे वारकरी’

गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते. शिवाय यावेळी मुख्यमंत्र्यासह पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळतो. यंदा लातूरमधल्या हकनाकवाडीच्या फड दाम्पत्याला मानाचे वारकरी हा मान मिळाला.

Jun 30, 2012, 10:37 AM IST

पालख्या पंढरीच्या उंबरठ्यावर...

सावळ्या विठूरायाच्या भेटीसाठी आतूर झालेल्या वारकऱ्यांचा मेळा आता पंढरपुरात दाखल होईल. आज वाखरीचा मुक्काम आटोपून सर्व पालख्या पंढरपूरकडे रवाना होतील.

Jun 29, 2012, 10:44 AM IST