www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर
अवघं पंढरपूर आज भक्तिरसात न्हाऊन निघालय. तहानभूक हरपून विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक यंदा वैकुंठनगरीत दाखल झालेत. चंद्रभागेच्या तिरी लाखो वारक-यांचा मेळा जमला आहे.
आषाढी एकादिशीच्या निमित्तानं आज पंढरपूर नगरी वारक-यांनी फुलून गेलीये.. तब्बल दहा लाख भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पंढरपूरात आज पहाटे विठ्ठल-रुक्मीणीची परंपरेनुसार महापूजा करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील जाफराबादचे नामदेवराव वैद्य आणि त्यांच्या पत्नी गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरले. परंपरेनुसार आषाढीच्या पूजेचा मान मुख्यमंत्र्यांकडे असतो त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. विठ्ठलाच्या मुर्तीला स्नान घालण्यात आलं त्यानंतर मुर्तीवर अत्तर आणि वस्त्रालंकार चढवण्यात आलं. त्यानंतर विठ्ठलाला महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला आणि आरती करण्यात आली.
विठ्ठलाच्या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी गरूड खांबाची भेट घेतली या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना मंत्राक्षता देण्यात आल्या. राज्यात मंगल घडावं राज्यावर कोणतंही आरिष्ठ येवू नये यासाठी या मंत्राक्षता देण्यात येतात.. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रूक्मिणी मातेच्या मंदिरात जावून रूक्मिणी मातेचं दर्शन घेतलं.
विधीवत मातेचं स्नानाचा विधी पार पडला त्यानंतर उत्पात घराण्यातील प्रमुखानं रूक्मिणीमातेच्या मुर्तीला मोठ्या कुशलतेनं नऊवारी साडी नेसवली.. त्यानंतर मातेला श्रृंगारीत करण्यात आलं.. आणि मातेची महापूजा करण्यात आली. महाआर्तीनंतर मातेला फराळाचा नैवैद्य अर्पण करण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.