www.24taas.com, झी मीडिया,
पंढरीच्या वारीप्रमाणे निवृत्तीनाथांच्या वारीला प्रथमच शासकीय सलामी मिळाली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने पालकमत्र्यांच्या उपस्थितीत यावर्षापासून या वारीत सहभागी होणाऱ्या विणेकऱ्यांचा यथोचित सन्मान केला आहे. येत्या निवडणुकांचा पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथांच्या या जेष्ठ पाल्खीवरील आतापर्यंतचा होणारा अन्याय दूर झाला आहे.
वारकरी पंथांची सुरुवात करणारे नाथ संप्रदायाचे जनक निवृत्तीनाथ..आषाढी वारीला यांच्या समाधीस्थळापासून सुरुवात होते..दरवर्षी सर्वात जेष्ठ वारी म्हणून या वारीला आषाढीत सन्मान मिळतो..विठ्ठलाच्या दरबारी निवृत्तीनाथांची पालखी सर्वात अगोदर भेट घेते...गुरु शिष्यांच्या या परंपरेला मात्र आता पर्यंत नाशिक जिल्ह्यात कुठलाही शासकीय मान मिळत नव्हता..तो यावर्षी सुरु करण्यात आला आहे .आता दरवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयात निवृत्तीनाथांच्या विणेकर्यांचा सन्मान शाल, श्रीफळ देऊन करण्यात येणार आहे.
वारकऱ्यांमध्ये ही प्रथा सुरु झाल्याने आनंद व्यक्त होतोय. या वारीला सन्मान मिळाला असला तरी वारकऱ्यांना आवशयक असलेल्या मुलभूत सुविधांकडे शासनाच दुर्लक्ष होत असल्याचे वारक-यांना वाटतंय. लोकसभेच्या निवडणुकांची तयारी आता सर्वच पक्ष करतायेत. त्यामुळे वारकरीही जे पदरात पाडून घेता येईल त्याकडे लक्ष देऊ लागले आहेत. काहीही असो या निमित्ताने ज्ञानेश्वरांच्या गुरुमाउलीला म्हणजेच निवृत्तीनाथांनाही यां निमित्ताने सन्मान मिळाला हेही थोडेथोडके नव्हे...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.