www.24taas.com, पंढरपूर
गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते. शिवाय यावेळी मुख्यमंत्र्यासह पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळतो. यंदा लातूरमधल्या हकनाकवाडीच्या फड दाम्पत्याला मानाचे वारकरी हा मान मिळाला.
लातूरस्थित मुरलीधर फड आणि दिपाली फड यांना मुख्यमंत्र्यांसह पूजा करण्याचा मान मिळाला. मुरलीधर फड हे उच्चशिक्षित वारकरी आहेत. वीटभट्टी कामगार म्हणून ते काम करतात. त्यांच्या घराण्याला ५० वर्षांची वारकरी परंपरा आहे. मुरलीधर यांचे वडिल गेली अनेक वर्ष वारी करत होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून मुरलीधर वडिलांची परंपरा पुढं चालवतायत. फड दांम्पत्याला 2 मुलं आणि 2 मुली आहेत.. राज्यात पाऊस पडू दे अशी प्रार्थना विठूरायाकडं केल्याचं या दाम्पत्यानं सांगितलंय.
.