लोकसभा निवडणूक : कोणी भरलेत अर्ज, भाजपमध्ये गोंधळ
विदर्भात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान १० एप्रिलला होतंय. यांत विदर्भातल्या मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. भाजपचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
Mar 22, 2014, 08:48 PM ISTविदर्भात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
आज विदर्भात लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. विदर्भातील प्रमुख उमेदवारा आज अर्ज भरतील.
Mar 22, 2014, 10:01 AM ISTशिवसेना विरोधात यवतमाळ-वाशिमधून मनसेतर्फे उमेदवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. हे सर्व उमेदवार शिवसेनेला जोरदार टक्कर देणार आहेत. यवतमाळ-वाशिमधून मनसेतर्फे उमेदवार देण्यात आलाय. शिवसेनेने आधीच भावना गवळी यांना उमेदवारी दिलेय. त्यामुळे शिवसेना-मनसे सामना पाहायला मिळणार आहे.
Mar 21, 2014, 09:05 PM ISTअबब... नंदन निलकेणी ७,७००,००,००,००० रुपयांचे मालक!
७,७००,००,००,०००... काय आकडा वाचता येतोय का? इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि बंगलोर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार नंदन नीलकेणी यांच्या कुटुंबाची ही संपत्ती...
Mar 21, 2014, 04:59 PM ISTऔरंगाबादमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता
औरंगाबादच्या शांतीगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
Mar 18, 2014, 04:51 PM ISTलोकसभेसाठी `आप`चे महाराष्ट्रातून सहा उमेदवार जाहीर
आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातून लोकसभेचे आणखी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रतिभा शिंदे, अभिनेत्री दीपाली सय्यद यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Mar 15, 2014, 07:23 PM ISTशेकाप आक्रमक, सेनेचा घरोबा तोडून विरोधात उमेदवार
शेतकरी कामगार पक्षानं शिवसेनेबरोबरचा घरोबा तोडलाय. गेल्या काही निवडणुकांमधली एकमेंकांबरोबरची सहकार्याची भूमिका सोडून शेकापनं शिवसेनेच्या विरोधात उमेदवार जाहीर केलेत.
Mar 14, 2014, 08:01 PM ISTलोकसभा निवडणूक : भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा यांचे चिंरजीव जयंत तर प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Mar 13, 2014, 09:20 PM ISTलोकसभा निवडणूक : काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 71 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.
Mar 13, 2014, 07:43 PM ISTरायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे रिंगणात
जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना रायगडमधून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी तटकरेंच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे रायगडमध्ये अनंत गीतेंची तटकरेंशी लढत रंगणार आहे.
Mar 13, 2014, 05:45 PM ISTगुल पनागला उमेदवारी, `आप` कार्यकर्ते नाराज
बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग आम आदमी पार्टीच्या तिकीटावर चंदीगडमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. गुल पनाग हिची उमेदवारी जाहीर झाल्याने अनेक जण नाराज आहेत.
Mar 13, 2014, 05:37 PM ISTनवनीत कौर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
लोकसभा निवडणूक २०१४ साठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या नवनीत कौर राणा यांच्यावर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mar 13, 2014, 02:42 PM ISTसुरेश खोपडे हे`आप`चा हिट फॉर्म्युला, बारामती करणार सर?
लोकसभा निवडणुकीची`आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्रीतील उमेदवारांसाठी ही तिसरी यादी आहे. या यादीत १७ उमेदवारांची नावे जाहीर केलीत. माजी आयपीएस सुरेश खोपडे बारामतीतून तर रघुनाथदादा पाटील हातकणंगलेतून रिंगणात, निहाल अहमद धुळ्यातून मैदानात आहेत. मात्र, खोपडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
Mar 12, 2014, 10:08 PM IST‘आप’ची मुंबईत तोडफोड, चौकशी करणार – आर आर
आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या रिक्षा आणि लोकलमध्या प्रवासाचा गोंधळ चर्चगेट स्टेशनवर दाखल झाल्यानंतरही कायम होता. उत्साही कार्यकर्त्यांनी सुरक्षा यंत्रणेची तोडफोड केली. या तोडफोडीची चौकशी करण्यात येईल असं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
Mar 12, 2014, 05:37 PM ISTलोकसभा निवडणूक : `आप`ची पाचवी यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीसाठी `आप`ने जोरदार फिल्डींग लावली आहे. लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याबाबत मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई दौऱ्यावर आपचे नेते अरविंद केजरीवाल आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलेय. त्याचवेळी `आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 17 उमेदवारांची नावे जाहीर केलीत.
Mar 12, 2014, 04:30 PM IST