लोकसभा निवडणूक : काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 71 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 14, 2014, 07:26 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 71 जणांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली नाही.
भिवंडी आणि गडचिरोलीतून विद्यामान खासदारांचा पत्ता काँग्रेसने कापला आहे. सुनंदा पुष्कर प्रकरणानंतर शशी थरूर वादात अडकले होते. मात्र, काँग्रेसने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. तर माजी क्रिकेटर महमद अझरूद्दीन याचे तिकिट कापण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कोणाला मिळाली संधी
महाराष्ट्र
- हिंगोलीतून राजीव सातव
- भिवंडी - विश्वनाथ पाटील
- हातकलंगणे - कल्लापा आवाडे
- लातूर - दत्तात्रय बनसोड
- वर्धा - सागर मेघे
- गडचिरोली - डॉ. नामदेव उसेंडी
- अकोला - हिदायत पटेल
- जालना - विलास औताडे
देशभरातून अन्य
- गाझियाबाद - राज बब्बर
- लखनऊ - रिटा बहुगुणा-जोशी
- मेरठ (युपी) - अभिनेत्री नगमा
- चंडीगड - पवन बंसल
- रांची - सुबोधकांत सहाय
- चालकुडी - पी. पी. चाको
- तिरुवनंतपुरम - शशी थरूर
- एर्नाकुलम - के. वी. थॉमस
- मुरादाबाद - बेगम नूर बानो

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.