नवनीत कौर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

लोकसभा निवडणूक २०१४ साठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या नवनीत कौर राणा यांच्यावर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 13, 2014, 02:42 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणूक २०१४ साठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या नवनीत कौर राणा यांच्यावर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोर्टाच्या आदेशानंतर नवनीत यांच्यावर कलम ४२०, ४६८,४७१ आणि ३४ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अमरावती मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत कौर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या नवनीत कौर या पत्नी आहेत. नवनीत कौर दाक्षिणेत अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.

मागासवर्गीय जात प्रमाणपत्राची वैधता प्रमाणपत्रावर निर्माण झालेल्या वादावर कोर्टानं हा निर्णय दिलाय. त्यामुळे आता नवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द होणार का? य़ाकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. जात प्रमाणपत्राची वैधताच रद्द केल्यास, नवनीत राणांची उमेदवारी आपोआप रद्द होईल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.