सुरेश खोपडे हे`आप`चा हिट फॉर्म्युला, बारामती करणार सर?

लोकसभा निवडणुकीची`आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्रीतील उमेदवारांसाठी ही तिसरी यादी आहे. या यादीत १७ उमेदवारांची नावे जाहीर केलीत. माजी आयपीएस सुरेश खोपडे बारामतीतून तर रघुनाथदादा पाटील हातकणंगलेतून रिंगणात, निहाल अहमद धुळ्यातून मैदानात आहेत. मात्र, खोपडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 12, 2014, 10:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीची`आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्रीतील उमेदवारांसाठी ही तिसरी यादी आहे. या यादीत १७ उमेदवारांची नावे जाहीर केलीत. माजी आयपीएस सुरेश खोपडे बारामतीतून तर रघुनाथदादा पाटील हातकणंगलेतून रिंगणात, निहाल अहमद धुळ्यातून मैदानात आहेत. मात्र, खोपडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
सुरेश खोपडे हे मूळचे बारामतीतील मोरगावचे आहेत. सुरेश खोपडे हे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. दंगलींसाठी प्रसिद्ध असलेल्या भिवंडीत त्यांनी `मोहल्ला कमिटी` चा यशस्वी प्रयोग केला होता. त्यांचा हा मोहल्ला कमिटीचा फॉर्म्युला `आप`चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतही वापरला होता. हा फॉर्म्युला हिट झाल्याने केजरीवाल यांची जादू दिल्लीतील राजकारणात दिसून आली.
या पार्श्वभूमीवर `आप` पक्षातर्फे त्यांना लोकसभेची निवडणूक लढविण्याची ऑफर दिल्याचे समजते. `आप`कडून बारामती लोकसभा मतदार संघासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे खोपडे या फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती करतात का, याची उत्सुकता लागली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी `आप`ने जोरदार फिल्डींग लावली आहे. लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याबाबत मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई दौऱ्यावर आपचे नेते अरविंद केजरीवाल आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलेय. त्यासाठी चांगले उमेदवार देऊन निवडणुकीत रंगत आणण्याचे धोरण `अाप`ने राबविले आहे.
यात निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आणि पूर्वाश्रमीचे मालेगावचे संयुक्त जनता दलचे नेते निहाल अहमदही आपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.
आपचे महाराष्ट्रीतील उमेदवार
उत्तर मुंबई - सतीश जैन
कल्याण - नरेश ठाकूर
बारामती - आयपीएस खोपडे
भिवंडी - जलाउद्दीन अन्सारी
बुलढाणा - सुधीर सुर्वे
हातकलंगले - रघुनाथ दादा पाटील
माढा - सविता शिंदे
धुळे - निहाल अहमद
नांदेड - नरेंद्रसिंग ग्रंथी
उस्मानाबाद - विक्रम साळवे
परभणी - सलमा कुलकर्णी
रायगड - डॉ. संजय अपरान्ती
रामटेक - प्रताप गोस्वामी
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग - कर्नल गडकरी
सातारा - चोरगे
शिर्डी - नितीन उदमाले
शिरूर - न्या. निकम

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.