महाराष्ट्रातील बदललेले / न बदललेले लोकसभा उमेदवार
लोकसभा निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी विद्यमान खासदारांवर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. तर अनेकांचा पत्ता काटत त्यांना थांबण्यास भाग पाडले. राज्यातील कोणत्या विभागात कोणाला मिळाली आहे संधी. आपला लोकसभेचा कोण आहे उमेदवार...
Apr 5, 2014, 10:31 AM ISTमनसे-भाजपवर मुख्यमंत्र्याचा हल्लाबोल
भाजप आणि मनसेची छुपी युती असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तर दुसरीकडे गृहमंत्री आर आर पाटील यांनी जोरदार टीका करताना दोघांची औकात दाखवून दया, अशी मतदारांना साद घालताना राज आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
Apr 3, 2014, 08:40 AM ISTराणे-राऊत कलगितूरा, कोकण विकास मुद्दा बाजुला
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा पार्ट टू रंगू लागलाय. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत दहावी नापास असल्याचा आरोप करणाऱ्या राणे कुटुंबाला राऊत यांनी थेट एमएची पदवी दाखवत चोख उत्तर दिलंय. सध्या तरी कोकणातलं राजकारण विकासाचे मुद्दे सोडून नको तिकडे भरकटलंय.
Mar 29, 2014, 12:34 PM ISTनरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे करीन - इम्रान मसूद
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे तुकडे तुकडे केले जातील, असे धक्कादायक विधान काँग्रेसचे लोकसभा उमेदवार इम्रान मसूद यांनी केले आहे. त्यामुळे या विधानाने काँग्रेस आणि भाजपमध्ये नव्याने वाद उफाळणार आहे. मेसूद यांची भाषा घसरल्याने रायकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
Mar 28, 2014, 12:37 PM ISTराज ठाकरेंच्या शहरी भागात सभांचा धडाका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच ३१ मार्चला पुण्यात होत आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. मनसेने शहरी भागात लोकसभेचे उमेदवार दिलेत. त्यामुळे शहरांमध्ये राज ठाकरे यांनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. यामुळे शिवसेनेला डोकेदुखी होण्याचे संकेत आहेत.
Mar 28, 2014, 12:05 PM ISTकाँग्रेस उमेदवार अभिनेत्री नगमा यांनी श्रीमुखात भडकावली
मेरठमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आणि अभिनेत्री नगमा यांनी अतिउत्साही कार्यकर्त्याच्या श्रीमुखात भडकावली. मेरठमध्ये सभेसाठी आलेल्या नगमा या कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकल्या होत्या.
Mar 28, 2014, 11:24 AM ISTमावळमधील सेनेचे श्रीरंग बारणे `मालामाल`
मावळ लोकसभा मतदार संघात कोण निवडून येणार हे सांगता येत नसलं तरी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी श्रीमंतीत मात्र बाजी मारलीय. श्रीरंग बारणे यांची एकूण मालमत्ता ६६ कोटी ९२ लाख रुपयांची असून, त्यांच्याकड एक रिव्हॉल्वरही आहे.
Mar 28, 2014, 09:42 AM ISTराणे-शिवसेनेत जुंपली, ...तर विष खाईन - रामदास कदम
नारायण राणेंनी शिवसेना सोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली होती, असा रामदास कदम यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. एकवेळ विष खाऊन मरेन, पण शिवसेना सोडणार नाही, असं कदमांनी राणे यांना ठणकावलं.
Mar 27, 2014, 09:06 AM ISTराणेंना मदत न करण्यावर राष्ट्रवादी कार्यकर्ते ठाम
सिंधुदुर्गात नारायण राणेंना मदत करणार नसाल तर खड्यासारखे बाजूला करू असा इशारा उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला होता. तरीही कार्यकर्ते माघार घ्यायला तयार नाहीत. वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊ पण राणेंना मदत करणार नाही असा पवित्रा त्यांनी आता घेतलाय. सामंतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळलीय.
Mar 27, 2014, 08:59 AM ISTकाँग्रेस, केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल, देशासाठी हे धोकादायक - मोदी
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आजपासून सुरु झालेल्या भारत विजय रॅलीत अरविंद केजरीवालांवर हल्लाबोल केला. केजरीवाल पाकिस्तानचे एजंट असल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानला तीन AK मिळाले आहेत, AK -47 , AK एन्टोनी आणि एके -49 म्हणजेच केजरीवाल हे तीन एके असल्याचा टोलाही मोदींनी लगावला.
Mar 26, 2014, 03:35 PM ISTकाँग्रेसचा जाहीरनामा विकास मॉडेल - सोनिया गांधी
युपीएच्या काळात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. काँग्रेसचं विकास मॉडेल सर्वोत्तम आहे. जाहीरनाम्यासाठी 10,000 लोकांशी चर्चा केली. त्यातून हा जाहीर तयार करण्यात आला आहे. हा जाहीरनामा 2014 च्या निवडणुकांसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.
Mar 26, 2014, 03:16 PM ISTलोकसभा निवडणुकीत भाजपची स्टार पॉवर मैदानात
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं आपली स्टार पॉवर मैदानात उतरवलीय. माजी केंद्रीय मंत्री आणि चित्रपट अभिनेते विनोद खन्ना यांना पंजाबमधल्या गुरुदासपूरमधून उमेदवारी देण्यात आलीय.
Mar 26, 2014, 10:59 AM ISTभाजपचे दोन उमेदवार जाहीर, पुणे-लातूरचा प्रश्न सुटला
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील आणखी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. पुण्यातून अनिल शिरोळे तर लातूरमधून सुनील गायकवाड यांना भाजपनं उमेदवारी दिलीय.
Mar 23, 2014, 11:00 PM ISTराष्ट्रवादीत आहोत असे सांगणारे गावित भाजपच्या व्यासपिठावर
नंदुरबार जिल्ह्याच्या घराघरात कमळ पोहचावा, असं आवाहन करत, राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले मंत्री डॉ विजयकुमार गावित हे साक्री आणि नंदुरबार या दोन ठिकाणी भाजपच व्यासपीठावर दिसून आले.
Mar 23, 2014, 09:58 PM ISTभाजपमध्ये गोंधळ, जसवंत सिंगांची जोरदार टीका
भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग राजस्थानमधल्या बारमेरमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी नाकारल्यानं पक्षावर नाराज असलेले जसवंत सिंह उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. `अँडजस्ट करुन घ्यायला मला काय फर्निचर समजताय का ?, अशा कडक शब्दात जसवंत सिंह यांनी आपला संताप व्यक्त केलाय.
Mar 23, 2014, 08:17 PM IST