www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा यांचे चिंरजीव जयंत तर प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामधून पूनम महाजन यांना हे तिकीट देण्यात आलंय, त्यामुळं या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्याविरोधात पूनम यांची लढत होणार आहे. तर दार्जिलिंगमधून एस. एस. अहलूवालिया यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, आम्ही प्रथम शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी बोलणार आहोत. त्यानंतर पाटणा येथून कोणाला उमेदवारी द्यायची हे स्पष्ट केले जाईल, अशी माहिती भाजप नेते अनंत कुमार यांनी यावेळी सांगितले.
जाहीर उमेदवार
- उत्तर मध्य मुंबई - पूनम महाजन
- ग्वॉलियर - नरेंद्र सिंग तोमर
- विदिशा (मध्य प्रदेश) - सुषमा स्वराज
- हजारीबाग - जयंत सिन्हा
(यशवंत सिन्हा यांचा मुलगा)
- गिरिडीह - रवींद्र पांडे
- रांची - रामथहाल चौधरी
- लोहरदगा - सुदर्शन
- दार्जिलिंग - एस. एस. अहलूवालिया
- दरभंगा - किर्ति आझाद
- सरन - राजीव प्रताप रुडी
- नावाडा - गिरीराज सिंग
- पाटलिपुत्र - रामकृपाल यादव
- आराह - आर के सिंग
- भागलपूर - शाहनवाज हुसैन
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.