अबब... नंदन निलकेणी ७,७००,००,००,००० रुपयांचे मालक!

७,७००,००,००,०००... काय आकडा वाचता येतोय का? इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि बंगलोर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार नंदन नीलकेणी यांच्या कुटुंबाची ही संपत्ती...

Updated: Mar 21, 2014, 04:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
७,७००,००,००,०००... काय आकडा वाचता येतोय का? इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि बंगलोर दक्षिण लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे उमेदवार नंदन नीलकेणी यांच्या कुटुंबाची ही संपत्ती... यामध्ये, निलकेणी स्वत:ची आणि त्यांच्या पत्नी रोहिणी नीलकेणी यांच्याकडे जवळपास ७ हजार ७०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचं त्यांनी नुकतंच जाहीर केलंय.
नीलकेणी यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, इन्फोसिस कंपनीची सुरुवात फक्त २०० रुपयांनी झाली. तेव्हा नुकतेच त्यांनी आयआयटीमधून पदवी मिळवली होती. इन्फोसिसच्या यशाने त्यांना ७७०० कोटी रुपयांची मालमत्ता मिळवून दिली. त्यांच्या मालमत्तेपैंकी ८० टक्के भाग इन्फोसिसचा हिस्सा आहे. नंदन यांच्याकडे इन्फोसिसची १.४५ टक्के आणि रोहिणीकडे १.३ टक्के भागीदारी आहे.
बंगलोर दक्षिणमधून पाच वेळा भाजपचे खासदार अनंत कुमार यांनी गुरुवारी स्वत:ची मालमत्ता जाहीर केली. त्यामध्ये अनंत कुमार यांची ५१.१२ लाख आणि त्यांची पत्नीची मालमत्ता ३.८६ कोटी रुपये असल्याचं समजतय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.