www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीची`आप`ने आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १७ उमेदवारांची तिसऱ्या यादीतील नावे जाहीर केलीत. माजी आयपीएस सुरेश खोपडे बारामतीतून तर रघुनाथदादा पाटील हातकणंगलेतून रिंगणात, निहाल अहमद धुळ्यातून मैदानात आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी `आप`ने जोरदार फिल्डींग लावली आहे. लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याबाबत मोर्चेबांधणी सुरू आहे. मुंबई दौऱ्यावर आपचे नेते अरविंद केजरीवाल आले असून त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलेय. आम आदमी पार्टीची तिसरी यादी जाहीर झाली आहे.
यात महाराष्ट्रातल्या १७ उमेदवारांचा समावेश आहे. यात निवृत्त आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील आणि पूर्वाश्रमीचे मालेगावचे संयुक्त जनता दलचे नेते निहाल अहमदही आपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.
आपचे महाराष्ट्रीतील उमेदवार
उत्तर मुंबई - सतीश जैन
कल्याण - नरेश ठाकूर
बारामती - आयपीएस खोपडे
भिवंडी - जलाउद्दीन अन्सारी
बुलढाणा - सुधीर सुर्वे
हातकलंगले - रघुनाथ दादा पाटील
माढा - सविता शिंदे
धुळे - अन्सारी निहाल अहमद मोहम्मद हरूण
नांदेड - नरेंद्रसिंग ग्रंथी
उस्मानाबाद - विक्रम साळवे
परभणी - सलमा कुलकर्णी
रायगड - डॉ. संजय अपरान्ती
रामटेक - प्रताप गोस्वामी
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग - कर्नल गडकरी
सातारा - चोरगे
शिर्डी - नितीन उदमाले
शिरूर - न्या. निकम
आसाम राज्य
मंगलदाईतून नम्रता शर्मा
धुबरी - अझमल हुसैन
करीमगंज - तरुण कुमार दास
जोरहाट - मनोरोम गोगोई
डिब्रूगढ़ - तपन सुतबानशी
गुवाहाटी - प्रांजल बोरडोलोय
बिहार राज्य
बांका - नीरज कुमार
बक्सर - डॉ. श्वेता पाठक
कटिहार - विक्टर झा
खगरिया - डॉ. स्वामी विवेकानंद
किशनगंज - अलीमुद्दीन अंसारी
मधुबनी - इरशाद
मुंगेर - संदीप कुमार
सासाराम ( अनुसूचित जाति ) - गीता आर्य
गुजरात राज्य
बनासकांठा रावल - संजय कुमार सोमनाथभाई
साबरकांठा सोलंकी - नटवरभाई गौव
अश्वशक्ति हमीरपुर - कमल कांत बत्रा
केरळ राज्य
चालकुडी - के एम नुरूद्दीन
एरनाकुलम- श्रीमती अनिता प्रताप
इडुक्की - सिल्वी सुनील
कासरगोड - एम. कृष्णन
कोट्टायम - अॅड. अनिलकुमार आर
मवेलिक्कारा (एससी ) - एन सदानंद
मध्यप्रदेश
बालाघाट - यू के. चौधरी
भिंड - कृष्णा महोबिया
छिन्दवाडा - महेश दुबे
देवास ( अनुसूचित जाति ) - सुजीत सांगते
धर - हेमलता धाड
राजगढ़ - प्रशांत त्रिपाठी
रतलाम - हेनरी मचार
उत्तर प्रदेश
बदायूं - हेमा मेहरा
फैजाबाद - इक्बाल मुस्तफा
महाराजगंज - पशुपतीनाथ गुप्त
शाजाहानपूर - अशर्फी लाल
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.