दोनदा मतदानाबाबत शरद पवार यांची सारवासारव
गावाकडे मतदान केल्यानंतर शाई पुसून मुंबईतही करा मतदान, दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला खरा. मात्र हा सल्ला त्यांच्या अंगाशी आल्यानंतर लगेच सावरासावर केली. दरम्यान टीकेनंतर पवारांनी आपल्या विधानावर सारवासारव केलेय. तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेय.
Mar 23, 2014, 07:40 PM ISTबोटावरची शाई पुसा, दोनदा मतदान करा- पवारांचा सल्ला
दोनदा मतदान करण्याचा अजब सल्ला शरद पवारांनी दिलाय. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. "आधी साताऱ्याला मतदान करा नंतर मुंबईत येऊन मतदान करा", असा धक्कादायक सल्ला पवारांनी दिलाय. बोटाची शाई पुसायला विसरु नका, असंही पवार म्हणाले.
Mar 23, 2014, 03:30 PM ISTजसवंत सिंहांचं बंड, बारमेरहून अपक्ष निवडणूक लढवणार
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांनी अखेर राजस्थानमधील बारमेर मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केलाय. ते उद्या सोमवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तर जसवंत सिंह यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार असलेले मानवेंद्र सिंह यांनीही पक्षाचं काम करणं अचानकपणे बंद केलंय.
Mar 23, 2014, 01:03 PM ISTइंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशतवाद्यांना जोधपूरमध्ये पकडलं
दिल्ली एटीएस आणि जयपूर पोलिसांच्या पथकानं दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला असून इंडियन मुजाहिद्दीनच्या ४ दहशतवाद्यांना अटक केलीय. मुंबईच्या झवेरी बाजार आणि हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात हात असलेल्यांसह इंडियन मुजाहिदीनच्या चार दहशतवाद्यांना जोधपूर इथं पकडण्यात आलं.
Mar 23, 2014, 11:53 AM ISTभाजपची अहमदाबाद पूर्वमधून परेश रावल यांना उमेदवारी
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं आपली स्टार पॉवर मैदानात उतरवलीय. अहमदाबाद पूर्वमधून परेश रावल यांना उमेदवारी देण्यात आलीय. अडवाणींचे खंदे समर्थक समजले जाणारे अहमदाबाद पूर्वमधील विद्यमान खासदार हरीन पाठक यांना डावलून परेश रावल यांना ही उमेदवारी देण्यात आलीय.
Mar 23, 2014, 09:13 AM ISTकाँग्रेसचा माणिकराव ठाकरेंना धक्का, मोघेंना उमेदवारी
काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील केवळ एकच उमेदवार जाहीर केला. मात्र, नांदेडचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का काँग्रेस देणार की त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे.
Mar 21, 2014, 10:57 PM ISTनाराज अडवाणींची समजूत काढण्यासाठी मोदी दिल्लीत!
भोपाळहून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असलेले लालकृष्ण अडवाणी गांधीनगरचं तिकीट मिळाल्यानं नाराज आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज अडवाणींच्या निवासस्थानी पोहोचलेत. अडवाणींच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी मोदींनी पक्ष मुख्यालयातही भेट दिली.
Mar 20, 2014, 09:24 AM ISTपेच नांदेडचा: कोणाला देणार काँग्रेस उमेदवारी?
नांदेड पुन्हा एकदा चर्चेत आलंय. काँग्रेसने काल आपली तिसरी यादी जाहीर केली. मात्र अजूनही नांदेडचा उमेदवार जाहीर केलेला नाही. इथून अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र अजून ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
Mar 19, 2014, 05:30 PM ISTजेव्हा `पडद्यावरचे दोन शिवाजी` करतील मनसे, शिवसेनेचा प्रचार!
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. तर अभिनेते महेश मांजरेकर यांचं नाव मनसेचे लोकसभेचे उमेदवार म्हणून यापूर्वीच जाहीर झालंय. आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर अमोल कोल्हेंनी शिवसेनेत प्रवेश केला. आता हे दोन शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
Mar 19, 2014, 01:17 PM ISTसेनेचं नेतृत्व वाट लावणारं नाही, तर वाट दाखवणारं - कोल्हे
अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेवून ही माहिती दिली. यावेळी बोलतांना डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण भगव्या कायम मान राखू असं म्हटलंय.
Mar 19, 2014, 11:48 AM ISTभटकळच्या सुटकेसाठी नेत्यांच्या अपहरणाचा डाव
२०१४ च्या लोकसभा निडवणुकांवर दहशतवादाचं सावट दिसून येतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत सगळ्या पोलीस उपायुक्तांना एक अलर्ट जारी करण्यात आलाय.
Mar 19, 2014, 10:32 AM ISTलालकृष्ण अडवाणींना गांधीनगरहून मिळणार उमेदवारी
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे अखेर गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुजरात भाजपच्या संसदीय मंडळाने गांधीनगरमधून केवळ अडवाणींच्याच नावाची शिफारस केलीय.
Mar 18, 2014, 04:32 PM ISTराष्ट्रवादीच्या कपिल पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश!
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयाराम गयारामचा सिलसिला सुरूच आहे. राष्ट्रवादीला आणखी एक धक्का देत भाजपनं भिवंडीचे शहरप्रमुख आणि ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष कपिल पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय.
Mar 18, 2014, 04:10 PM ISTचव्हाण-कलमाडींना काँग्रेस पुन्हा संधी देणार?
काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यात महाराष्ट्रातल्या उमेदवार जाहीर न झालेल्या जागांचा समावेश असण्याची चिन्ह आहेत.
Mar 18, 2014, 12:27 PM ISTराहुल गांधी ‘गुगल सर्च’वरही मोदींच्या मागे!
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा पिछाडीवर पडले आहेत... थांबा निवडणुकीचा निकाल नाही लागला... हा निकाल आहे फेब्रुवारी महिन्याच्या `गुगल सर्च`चा. राहुल गांधींना पिछाडीवर टाकत नरेंद्र मोदी यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. गेल्या महिन्यात राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना जास्त लोकांना सर्च केलंय. तर दुसऱ्या नंबरवर अरविंद केजरीवाल आहे.
Mar 18, 2014, 09:48 AM IST