भाजपची अहमदाबाद पूर्वमधून परेश रावल यांना उमेदवारी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं आपली स्टार पॉवर मैदानात उतरवलीय. अहमदाबाद पूर्वमधून परेश रावल यांना उमेदवारी देण्यात आलीय. अडवाणींचे खंदे समर्थक समजले जाणारे अहमदाबाद पूर्वमधील विद्यमान खासदार हरीन पाठक यांना डावलून परेश रावल यांना ही उमेदवारी देण्यात आलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 23, 2014, 09:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं आपली स्टार पॉवर मैदानात उतरवलीय. अहमदाबाद पूर्वमधून परेश रावल यांना उमेदवारी देण्यात आलीय. अडवाणींचे खंदे समर्थक समजले जाणारे अहमदाबाद पूर्वमधील विद्यमान खासदार हरीन पाठक यांना डावलून परेश रावल यांना ही उमेदवारी देण्यात आलीय.
पाटणा साहिबमधून बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघन्स सिन्हा उमेदवार आहेत. ड्रीम गर्ल हेमा मालिनी मथुरातून निवडणूक लढवतायेत. तर किरण खेर यांना चंदीगडधून पक्षानं तिकीट दिलंय. आपल्या रॉकींग संगीतानं एक काळ गाजवणारे बप्पी लहरी पश्चिम बंगालमधल्या श्रीरामपूरमधून भाजप आणि मोदींचा राग आळवणार आहेत.
ईशान्य दिल्लीतून भोजपूरी कलाकार मनोज तिवारींना पक्षानं उमेदवारी दिलीय. आता या स्टार पॉवरचा भाजपला किती उपयोग होतो तसंच यापैकी किती स्टार निवडणूक जिंकणार हे निकालाच्या दिवशीच कळेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.