लालकृष्ण अडवाणींना गांधीनगरहून मिळणार उमेदवारी

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे अखेर गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुजरात भाजपच्या संसदीय मंडळाने गांधीनगरमधून केवळ अडवाणींच्याच नावाची शिफारस केलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 18, 2014, 04:32 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे अखेर गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातूनच लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुजरात भाजपच्या संसदीय मंडळाने गांधीनगरमधून केवळ अडवाणींच्याच नावाची शिफारस केलीय.
अडवाणींच्या उमेदवारीबाबत आता केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे गुजरातमधून लोकसभा निवडणूक लढवणार की नाहीत, याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून मोदींची उमेदवारी याआधीच जाहीर झाली आहे. मात्र मोदींनी गुजरातमधूनही निवडणूक लढवावी, अशी शिफारस गुजरात भाजपच्या वतीनं केंद्रीय संसदीय मंडळाला करण्यात आलीय. याबाबत मोदी आता काय निर्णय घेतात, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.