नाराज अडवाणींची समजूत काढण्यासाठी मोदी दिल्लीत!

भोपाळहून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असलेले लालकृष्ण अडवाणी गांधीनगरचं तिकीट मिळाल्यानं नाराज आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज अडवाणींच्या निवासस्थानी पोहोचलेत. अडवाणींच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी मोदींनी पक्ष मुख्यालयातही भेट दिली.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 20, 2014, 09:24 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भोपाळहून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असलेले लालकृष्ण अडवाणी गांधीनगरचं तिकीट मिळाल्यानं नाराज आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, नितीन गडकरी आणि सुषमा स्वराज अडवाणींच्या निवासस्थानी पोहोचलेत. अडवाणींच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी मोदींनी पक्ष मुख्यालयातही भेट दिली.
दरम्यान काल अडवाणींची समजूत काढण्यासाठी सुषमा स्वराज आणि गडकरी त्यांच्या निवासस्थानी गेले. मात्र आपण यावर सहमत नसून भोपाळच्या तिकीट वाटपानंतरच निर्णय कळवू, असं अडवाणींनी स्पष्ट केलं. दरम्यान, भाजपनं निर्णय बदलण्यास नकार दिला आहे. गेल्या विधानसभेत भाजपचा गांधीनगरमध्ये पराभव झाला होता. मोदी दगाफटका करून आपला पराभव करतील असं अडवाणींना वाटतं.
भाजपनं आपल्या उमेदवारांची पाचवी यादी बुधवारी जाहीर केली. ६७ उमेदवारांच्या यादीत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगरचं तिकीट दिलं. तर नरेंद्र मोदी बडोद्याहूनही निवडणूक लढवतील. सोबतच भाजपच्या यादीत महाराष्ट्रायत नंदुरबार इथून डॉ. हिना गावित, भिवंडीतून कपिल पाटील, निवडणूक लढवतील. अभिनेत्री हेमा मालिनी यांना मथुरेतून उमेदवारी देण्यात आली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.